spot_img
spot_img

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी केली कार्यानुभवातून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षामध्ये शिकत असणाऱ्या पशु आणि दुग्धशास्त्र विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूधापासून विविध पदार्थांची निमिर्ती केली.यात बासुंदी, पेढे, सुगंधी दुध, पनीर, आईसक्रीम, खवा, श्रीखंड, लस्सी, मठ्ठा, दही, बर्फी, गुलाबजामुन, व्हे सुप आदी पदार्थांची निर्मिती करण्यात आली होती.

प्रवरा परिसरामध्ये या सर्व पदार्थांची विक्री करून विक्रीतील कौशल्य जाणून घेण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थांना कृषी व संलग्नित विभागाचे संचालक डॉ. उत्तमराव कदम ,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी, पशु व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॅा. दिपाली तांबे, प्रा. टी. डी. साबळे, डॉ. गोरक्षनाथ अंत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांमध्ये   ओमकार पाटील, सागर नरवडे, विनायक जगदाळे, संकेत कर्डीले, गोवर्धन मते, रितेश लोंढे, नितीन धारकर, आकांक्षा निकत, साक्षी शिंदे, शुभदा टापरे, वैष्णवी सातपुते, धनश्री शिरसिकर , दिशा काकडे आदींचा समावेश होता.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!