कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हार बुद्रुक येथे आषाढी एकादशीनिमित्त बाल गोकुलम अकॅडमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई, वारकरी व विविध संत महात्म्यांच्या वेशभुषा परिधान करुन टाळ, मृदुंग, तुळशी वृंदावन या सोबत घेवून विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, माझे माहेर पंढरपूर अशा विविध भक्ती गीताचा जयघोष करत पायी दिंडी भगवती माता मंदीर ते विठ्ठल मंदीर या मार्गावर काढण्यात आली.
या दिंडी सोहळ्याचे स्वागत कोल्हार बुद्रुक येथील भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खर्डे पाटील, आबा राऊत, दिलीप शेळके व विलास खर्डे आदी ग्रामस्थांच्या हस्ते विठू माऊलीची आरती करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवर, पालक वर्ग, ग्रामस्थ यांच्या समोर विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यातील रिंगण करून विविध अभंग गाऊन व नाट्य सादर करून कौतुकाची थाप मिळवली.
शाळेचा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापिका शारदा सोन्याबापु मोरे, संचालक सोन्याबापु मोरे, सहशिक्षिका माधुरी निबे, रेवती ससाने, संतोषी मोरे, प्रतीक्षा राऊत, प्रतीक्षा कोल्हे, स्नेहा आयनोर आदी शिक्षकांनी प्रयत्न केले.



