याप्रसंगी अध्यक्ष अनिता कांबळे यांनी बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व विशद करताना सांगितले की भगवान बुद्धांचा जन्म हा वैशाखी पौर्णिमेला झाला त्यांना ज्ञानप्राप्ती ही वैशाखी पौर्णिमेलाच झाली आणि त्यांचे महापरिनिर्वाणही वैशाखी पौर्णिमेलाच झाले हा खूप मोठा योगायोग आहे .म्हणून बुद्ध पौर्णिमा अखंड भारतासह संपूर्ण जगात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.
मुकींदपुर येथे ठिकठिकाणी बौद्ध पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी
नेवासा फाटा( प्रतिनिधी) :-नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर(नेवासा फाटा) येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या मुकिंदपुर शाखेतील महिला आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष वनिता कांबळे यांनी मानले. याप्रसंगी अरुण निपुंगे, भारती यादव, नंदा खंडागळे, मंगल गुनावंत, अलका गजभिव, अर्चना आरले, इंदुबाई ताकवाले आदी महिलांसह भारत कांबळे, दशरथ कांबळे, पोलीस पाटील आदेश साठे, भास्करराव लिहिणार, नानासाहेब बनकर, गणपत मोरे, भाऊसाहेब पंडित, ऍड सुदाम ठुबे, अल्हाट सर, प्रभाकर ताकवले, विजय चौधरी, विकास कांबळे, विशाल कांबळे, विशाल पवार ,शिनगारे साहेब आदी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



