श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- श्रीरामपूर विधानसभेच्या विद्यमान लोकप्रतिनिधींची आवर्तन काळातील गैरहजेरी तालुक्यातील पाटपाण्यासाठी कर्दनकाळ ठरली आहे. ऐन पाटपाण्याचे आर्वतन येण्याच्या वेळी विद्यमान लोकप्रतिनिधी तालुक्याबाहेर असल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांवर यांचा वचक राहीला नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीसाठी आवश्यक पाण्यासाठी मोठा संघर्ष करण्याची वेळ नागरीकांवर आली. असे परखड मत शेतकरी युवक संवाद यात्रेदरम्यान शेतकरी युवक आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना हेमंत ओगले यांनी मांडले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष सौ दिपाली ससाणे यांच्या उपस्थितीत शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली.
यात्रेच्या नवव्या दिवशी हेमंत ओगले यांनी सकाळच्या सत्रात श्रीरामपूर तालुक्यातील दिघी, दत्तनगर, खंडाळा येथील ग्रामस्थांसमवेत त्यांनी संवाद साधला. येथे कॉर्नर सभेत मनोगत व्यक्त करताना हेमंत ओगले म्हणाले की, तालुक्यातील शेती ही पाटपाण्यावरील शेती असुन विद्यमान लोकप्रतिनिधींनी योग्य नियोजन न केल्यामुळे मागील पाच वर्षाच्या काळात शेतीच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली याउलट स्व. जयंतराव ससाणे यांनी दिघी चारीचे पाणी टेलपर्यंत पोहचवीले होते. स्व. ससाणे हे त्यांच्या कामकाजाच्या काळात ते केवळ आमदार निधी वापरत नव्हते तर विकास कामांसाठी अनेक खासदारांचा निधी त्यांनी वापरला. तालुक्यात अनेक गावात झालेले शिरपूर पॅटर्न हे त्याचेच द्योतक आहे. प्रत्येक गावातील शेतकरी,युवक आणि ग्रामस्तांच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात करण ससाणे आणि हेमंत ओगले यांच्या तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्व. जयंतराव ससाणे यांनी भरघोस निधी दिला. तालुक्यात त्यांचा एक वेगळा ऋणानुबंध होता. आपल्या आशिर्वादाची आम्हाला गरज असल्याचे ते म्हणाले
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याने कामांना अडथळा आला असून.स्व. जयंतराव ससाणे आमदार असताना आणि मि जिल्हा परिषदेवर असताना तालुक्यातील पाटपाण्याचा प्रश्न मार्गी लावता आला. त्याबरोबरच शहरातील पाण्याचा मोठा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला. भविष्यात विकासकामांना वेग देण्यासाठी हेमंत ओगले हेच योग्य असुन श्रीरामपूर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तसेच येथील मतदारांना हेमंत ओगले यांच्या रूपाने चांगला पर्याय मिळाला आहे.
यावेळी स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.