शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी मतदारसंघाच्या संपूर्ण बॉर्डरवर जर कोणीही जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविण्याच काम केलं तर तुमची गाठ माझ्याशी आहे, असे वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. यामुळे या वक्तव्याची नगरच्या राजकारणात मोठी चर्चा होत आहे. या वक्तव्यातून डॉ. सुजय विखेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
नुकतेच सुजय विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघात आयोजित आपला ‘दादा आपल्या दारी’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यावेळी सुजय विखे पाटील यांच्या मनातील अनेक गोष्टी ओठांवर आल्या आहेत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो की, जर इथे कोणीही जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरवण्याचे काम केलं तर तुमची गाठ माझ्याशी आहे. इथ कोणीही असुरक्षित नाही. कोणालाही संरक्षणाची गरज नाही. इथं हिंदूंना गरज नाही आणि इथं मुसलमानांना देखील संरक्षणाची गरज नाही.
वर्षानुवर्षे आपण एकत्र राहिलोय, मग आज अचानक का संरक्षण हवंय. कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं. ज्यांना जातिवाद धर्मवाद करायचा असेल त्यांनी मला सांगा मग आम्हीही अर्ज करताना धर्म जात लिहायला सांगू.