20.6 C
New York
Wednesday, August 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

वीर जवान विठ्ठल जेजुरकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-  वीर जवान विठ्ठल जेजुरकर यांच्यावर राहाता  येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

विठ्ठल जेजुरकर (वय ४६) हे भारतीय सैन्य दलातील जाट १५ रेजिमेंटमध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते. ३ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांचे पार्थिव लष्करी वाहनातून राहाता येथे आणण्यात आले.

भारतीय लष्कराच्या जाट रेजिमेंट व पोलिसांनी हवाई फायर करून त्यांना मानवंदना दिली. कु. आकांक्षा हीने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी कर्नल मानस पांडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, नायब तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

सुभेदार विठ्ठल जेजुरकर हे वयाच्या १९ व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी बरेली, सिक्कीम, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान आणि कांगो देशातही सेवा बजावली होती.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!