श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ) :- तालुक्याच्या पूर्व भागात साईकृपा हिरडगाव उस कारखाना काढून आपण जनतेचा विकास करत आहोत, असे भासवून दोन पंचवार्षिक आमदारकी पदरात पडून घेतली. कारखान्याच्या भूमिपूजनासाठी अभिनेता सलमान खान आणून मोठ्या दणक्यात गाजावाजा करत उसाच्या कारखान्याचे भूमिपूजन केले. परंतु त्याच कारखान्यात शेतकऱ्यांच्या उसाची बिले रखडवली, बिलासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावले.
शेतकऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली. त्यांना तरीही पुन्हा सत्ता पाहिजे. या गोष्टी दबक्य आवाजात लोकांकडून तालुक्यात ऐकायला मिळत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढवले दूध व्यवसाय वाढवला मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र झाल्यामुळे त्याप्रमाणात उसाची लागवड झाली, असे वारंवार आ. बबनराव पाचपुते जनतेला सांगतात. पण कारखाना बंद पडला सामान्य जनतेला वेळेवर पैसे न देता जनतेला वाऱ्यावर सोडले. उसाची बिले थकवली. शेतकऱ्यांचे संसार देशोधडीला लागले. मुलींची लग्न मोडली. या गोष्टींची आजही नागरिकांमध्ये चर्चा आहे. हे तुम्ही नाकारू शकत नाहीत, अशी व्यथा सामान्य माणूस मांडत आहे.
हजारो शेतकऱ्यांच्या थकीत रक्कमेसाठी कारखाण्यावर वेळोवेळी जप्तीचे आदेश झाले. तरीही कोट्यावधी थकीत रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळाली नाही, अनेक उस वाहतूकदार, शेकडो कारखाना कर्मचारी यांचे पगाराची रक्कम थकवली गेली वेळेवर पगार न झाल्यामुळे काम सोडलेले कर्मचारी या गोष्टी सांगत आहेत. ही सर्व आर्थिक परिस्थितीने गरीब असणारी जनता आहे हातावर पोट असणारे गरीब शेतकरी कर्मचारी आपल्या व्यथा बोलून दाखवत आहेत. आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न सामान्य शेतकरी, नागरिक विचारत आहे.
साईकृपा हिरडगाव कारखान्याने अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची ऊसाची बिले वाहतूकदारांचे बिले थकवली वेळेवर पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊन शेतकरी उध्वस्त झाला. त्या शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षण थांबले लग्न थांबली. अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यासंबंधी अडचणी त्यांनी दूर कराव्यात. अनेक चुका करूनही लोक विसरतात, असे त्यांना वाटते. परंतु जीवनात उध्वस्त झालेली माणसे कधीच विसरत नाहीत.
– राजेंद्र नागवडे, चेअरमन- नागवडे स. सा. कारखाना



