spot_img
spot_img

शिक्षणा प्रमाणेच कला संस्कृृृतीमध्ये प्रवरा आघाडीवर – सौ. विखे पाटील  विद्यार्थ्याच्या कलागुणांनी रसिक मंत्रमुग्ध 

लोणी (जनता आवाज  वृत्तसेवा ):-महाराष्ट्राची लोकधारा.. लेक वाचवा.. शेतकरी व्यथा.. स्वच्छ भारत.. या नाटीका सह कोळी गित..शेतकरी गित… अशा विविध कला-गुणाचा संगम साधत लोणीच्या प्रवरा सांस्कृतिक आणि क्रिडा महोत्सव २०२४ हा कला अविष्कारसह सहकारांतून समृध्दीकडे हा संदेश देत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवनपट युवा पिढीपर्यंत पोहोचवणारा ठरला. पारंपारिक वाद्यासह डी.जे मुक्त गणेश उत्सव हा प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाचे खास आकर्षण ठरत आहे.

महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या प्रांगणात ब्रिलियन बर्डस स्कुल, प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, खा. बाळासाहेब विखे पाटील विद्यालय गोगलगाव, प्रवरा कृषी शास्त्र महाविद्यालय, पायरेन्स लोणी, प्रवरा माध्यमिक विद्यालय आडगाव,कांलेज ऑफ फार्मसी, प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, प्रवरा माध्यामिक विद्यालय,दुर्गापूर या विद्यार्थ्यांनी नृत्य सामुदायिक, वैयक्तीक नृत्य, नाटकी, गीत गायन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी गणेश उत्सवानिमित्त होत असलेला प्रवरा सांस्कृतिक आणि क्रिडा महोत्सव – २०२४ हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही लोणी परिसरासाठी मोठी पर्वणी ठरत आहे

यावेळी सौ. शालीनीताई विखे पाटील यांत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना आपल्या मिळालेल्या संधीचे सोनं करा अभ्यास बरोबरचं आपली कला ही जतन करा असा संदेश दिला. माझे फोटो बरच राहिले संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे लोणी येथील अनिल विखे, किसनराव विखे, अशोकराव धावणे, लक्ष्मण विखे, मधुकर विखे, नानासाहेब म्हस्के, संपतराव विखे, रवींद्र विखे, भाऊसाहेब विखे,सोपान विखे,रामभाऊ विखे,चांगदेव विखे,एन.डी. विखे,दिलीप विखे,संतोष विखे,

प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, डाॅ.आर.ए पवार, अर्जुन आहेर, डॉ. संजय भवर, डॉ. रविंद्र जाधव, विद्या घोरपडे डॉ. बी.बी. अंबाडे, रेखा रत्नपारखी संध्या रोकडे यांच्यासह लोणी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी विविध कला क्षैञात नेप्रदिपक यश संपादन करणाऱ्याचा सौ. शालीनीताई विखे पाटील, रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले.

प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवा अंतर्गत सहकारातून समृद्धीकडे हा संदेश देणार ठरत आहे. पद्मश्रींच्या विचाराचा आणि त्यांच्या कार्याची ओळख युवा पिढीला देण्यासाठी पोस्टर प्रदर्शन, त्यांच्या कार्याविषयी व्याख्याने, गणेश उत्सवानिमित्त गणेश उत्सवानिमित्त रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक संदेश देणारे रांगोळी स्पर्धा सर्वच महाविद्यालयांमध्ये संपन्न झाल संस्थेच्या ११५ शाळांच्या माध्यमातून डी.जे .ला फाटा देत यावर्षी प्रथमच ढोल, ताशा, लेझीम, पावली, लाठी-काठी या माध्यमातून जवळपास चार हजार शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून प्रवरेची वेगळी ओळख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून परिसराला झाली. विसर्जन मिरवणूक ही आगळीवेगळी करण्यासाठी मोठी तयारी प्रवरेच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरु आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!