पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र मोहटादेवी गडावरनवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. ३ ते १६ ऑक्टोंबर दरम्यान घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सव संपन्न होत आहे.
सर्व धार्मिक कार्यक्रम व विधि साजरा केला जाणार आहे.मोहटा देवीच्या दर्शनासाठी राज्याचा विविध भागातून लाखो देवी भक्त नवरात्र काळात दर्शनासाठी येतात.या भाविक भक्तांच्या सोयी सुविधासाठी मोहटा देवस्थान समितीने प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी कामकाजाला सुरुवात केली आहे.गर्भगिरीच्या डोंगररांगेत मोहटा देवीचे स्वयंभू स्थान स्थापित आहे.
या उंच डोंगरावर देवस्थान समितीने भव्यदिव मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिर परिसरात सुरुवाती पासून चांगला पाऊस झाल्याने डोंगररांग हिरवागार झाला असून देवीचे मंदिर व आसपासचा परिसर हिरवाईने नटला आहे. गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांना अडचण येणार नाही यासाठी सुलभ दर्शन बारी,पाणी,शौचालय,पार्किंग, निवारा,महाप्रसाद याची कामे देवस्थान समितीकडून युद्ध पातळीवर सुरू असून देख भाल दुरुस्तीचे काम हि सुरू आहे.
वन विभागाकडून मोहटा देवस्थानला मंदिर परिसराची मोठी जागा हस्तांतरित झाल्याने मंदिर परिसरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले आहे. मोहटा देवी गडावर सुमारे दोन हजार दुचाकी मोटरसायकल एकाच वेळी पार्किंग करता येणार आहे.त्यामुळे भाविकांना पायी जाण्यासाठीचे मोठे अंतर कमी होऊन कमी श्रमात देवीचे दर्शन घेता येणार आहे. सध्या मंदिर परिसरातील हनुमान मंदिरापासून पायऱ्यांचे काम, पार्किंग साठी जागा,रस्ते रुंदीकरण करून रस्ते मोठे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
त्यामुळे मोहटादेवी डोंगरावरील रस्त्यांची वाहतूक कोंडी व भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन देवी भक्तांना सुलभ दर्शन घेता येणार आहे. मोहटा देवीला येण्यासाठी सर्व मुख्य रस्ते खड्डे मुक्त असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे. रंगरंगोटी,दर्शन बारीतील रेलिंग दुरुस्ती, मंडप उभारणीचे कामे जोरात सुरू आहे.गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी मोहटादेवी गडावर सकाळी देवस्थान समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते घटस्थापना केली जाणार आहे.
शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर स. ०८:०० ते दू. १२:३० वा.होमहवन व पूर्णाहुती जिल्हा प्रमूख न्यायाधीश यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे. शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी कावडीचे पाणी व काल्याचे कीर्तन, रविवार १३ ऑक्टोबर रोजी श्री मोहटादेवी यात्रा, पालखी सोहळा, छबिना मिरवणुक,सोमवार १४ ऑक्टोबरला हजेऱ्या व हंगामा, बुधवारी १६ ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमेला नवरात्राची सांगता होणार आहे.शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. भाविक भक्तांनी देवी दर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री मोहटादेवी देवस्थान कडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील तनपुरवाडी फाटा ते आयटीआय कॉलेज बीड पाथर्डी या राज्य मार्ग दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर हून अधिक रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षापासून आहे. अनेक बैठका शासकीय अधिकाऱ्यांच्या या रस्त्याबाबत झाल्या रस्ता करावा अशी मागणी झाली. मात्र हा रस्ता कोणत्या विभागाचा आहे.हेच कळायला मार्ग नाही. रस्त्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे रस्ता करावा कोणी असा प्रश्न पडलेला आहे.त्यामुळे वर्षानुवर्ष देवीच्या भाविक भक्तांसह येथून प्रवास करणाऱ्या लोकांना रस्त्याच्या दुरावस्थेत सामना करावा लागत आहे.



