spot_img
spot_img

भातकुडगांव फाट्यावरील उपोषणाला माजी आ. चंद्रशेखर घुलेंचा पाठिंबा

शेवगाव(जनता आवाज वृत्तसेवा):-  शेवगाव तालुका सकल मराठा समाजाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून शेवगाव – नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगांव फाटा येथे शनिवार पासून अमरण उपोषण सुरु करण्यात आले.

या उपोषणस्थळी माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी सभापती क्षितीज घुले यांनी सदिच्छा भेट देवून पाठिंबा दिला. भातकुडगांव फाटा ( ता. शेवगाव ) येथे चंद्रकांत महाराज लबडे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, राम शिदोरे आदीसह मराठा बांधव उपोषणास बसले आहे. या उपोषण स्थळी तहसीलदार प्रशांत सांगडे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी भेटी देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी सभापती क्षितीज घुले यांनी सदिच्छा भेट देवून पाठिंबा दिला.

आमदार मोनिका राजळे उपोषणाला पाठिंबा देणार का ….?

शनिवारपासून भातकुडगाव फाटा येथे हे उपोषण सुरू आहे आमदार मोनिका राजळे या विविध कार्यक्रमा निमित्त दररोज तालुक्यात फिरत आहेत तसेच उपोषण स्थळाजवळून गेल्याचे बोलले जाते परंतू मराठा आमदार असलेल्या मोनिका राजळे यांनी उपोषणस्थळी जाणिवपूर्वक जाणे टाळल्याने मराठा बांधवांनी तिव्र नाराजी व्यक्त केली असून आमदार मोनिका राजळे यांना मराठी मतदानाची गरज राहिली नाही का असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!