कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू स्कूल योजनांमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक ट्रॅक्टरद्वारे गावात काढण्यात आली. या मिरवणुकीत लेझीम पथक,भजनी मंडळ विविध समाजसुधारकांच्या वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी,कलशधारी मुली,भारतातील विविध संस्कृतींच्या वेशभूषा हे प्रमुख आकर्षण होते.मिरवणुकीनंतर सभेचा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा तसेच संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विश्वस्त रेणुका कोल्हे या अध्यक्षा होत्या. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने सौ रेणुका भाभी कोल्हे यांच्या संकल्पनेतून शाडू माती पासून गणपती तयार करणे या उपक्रमांतर्गत प्रथम पाच क्रमांकाची व 10 उत्तेजनार्थ अशी एकूण 15 विद्यार्थ्यांना पारितोषिके वाटप करण्यात आली.
तसेच इयत्ता दहावीतील प्रथम 3 क्रमांकाचे विद्यार्थी, रयत प्रज्ञाशोध परीक्षा 7 वी, एन एम एम एस परीक्षा 8वी, शिष्यवृत्ती परीक्षा 8वी ,या विविध परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एम ठाकरे यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. मेहता कन्या विद्यामंदिरचे उपशिक्षक किरण चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर अण्णांच्या जीवनाविषयी व शैक्षणिक कार्याविषयी सखोल माहिती दिली. कर्मवीर अण्णांच्या विचारांचा वारसा व सामाजिक बांधिलकी जपत आपण एक उत्तम नागरिक बनावे असा संदेश चांदगुडे यांनी दिला. या कार्यक्रम प्रसंगी स्कूल कमिटी सदस्य किरण गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात सौ रेणुका कोल्हे यांनी यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले त्याचबरोबर कर्मवीर अण्णा व स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या विचारांचा वारसा जपत आपल्या विद्यालयाला एक आदर्श विद्यालय म्हणून नावलौकिक प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करावे असा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच श्री संदीप गायकवाड,स्कूल कमिटी सदस्य शिवाजीराव कोकाटे, बाळासाहेब निकोले, किरण गायकवाड, सल्लागार समिती सदस्य दगडू दरेकर, अतुल सुराळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम पाईक, शंकरराव पाईक, डॉ. सपना भंडारी, सचिन गायकवाड, ॲड. सुमित दरेकर, विनोद गायकवाड, श्री गुलाब भाई तांबोळी, सदस्य श्री मंचरे सर,श्री गलांडे सर तसेच शिक्षक पालक संघ, माता पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती या सर्व समित्यांचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री गांगर्डे बी.एस. यांनी मानले सूत्रसंचालन श्री उमेश बोढरे यांनी केले.



