नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):-धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाचे दोन आंदोलकांनी आज गुरुवार दि.26 रोजी सकाळी प्रवरा संगम येथील गोदावरी नदी मध्ये जलसमाधी घेतल्याचा दाट संयश व्यक्त होत आहे. आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार अशी चिट्ठी व मारुती अल्टो गाडी नदी पुलावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस व महसूल प्रशासन या दोघांचा कसून शोध घेत आहेत.
याबाबद अधिक माहिती अशी की,धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील 9 दिवसापासून नेवासा फाटा येथे सूरु असलेल्यां आंदोलनास धनगर समाजाचे 6 आंदोलक राजू मामा तागड, रामराव कोल्हे, भागवत भोजने, देवीलाल पंडित यांच्यासह नदीत उडी मारल्याचा संशय असलेले कोळसे आणि चोरमारे उपोषणासाठी बसले होते. त्यामधील बाळासाहेब कोळसे रा. आडगाव ता. पाथर्डी व प्रल्हाद सोरमारे रा. छ.संभाजीनगर यांनी प्रातर्विधीला जावून येतो असे सांगुन उपोषण स्थळावरून सकाळी निघून गेले व साडेनऊच्या दरम्यान धनगर समाजाच्या एक कार्यकर्ते राहुल नजन यांना फोन केला की “आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार” असे सांगून फोन बंद केला. कार्यकर्त्यांनी प्रशासनाला ही माहिती कळवताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे फौज फाट्यासह प्रवरासंगम येथील पुलावर पोचहले.
त्यांच्या पाठोपाठ तहसीलदार संजय बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, प्रांत सुधीर पाटील धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर हे ही घटना स्थळी पोहचले.
गोदावरी पुलावर प्रल्हाद सोरमारे यांची न्यू शिवम लॉज छत्रपती संभाजीनगर लिहिलेली एम एच 28 बी डब्ल्यू 7007 नंबरची मारुती ईरटीका कार उभी असून कारच्या डॅश बोर्डवर त्याला समाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली असून स्वतःचे मोबाईल सीटवर ठेवलेले आहेत. तसेच गाडीमध्ये डॅशबोर्डवर सकल धनगर मल्हार सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य असे नेमप्लेट सुद्धा ठेवलेली होती गाडी लॉक केलेली आढळून आली.
सकाळी कोळसे व सोरमारे यांचा पाण्यामध्ये शोध घेण्याचे स्थानिक लोकांनी कार्य सूरु केले पण जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर चे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने शोध कार्यासाठी मर्यादा आल्या शासकीय यंत्रणा मुंबईपासून दिल्लीपर्यंत हालली केंद्रीय अपात कालीन मदत पथक( एनडीआरएफ) ची तूकडी बोलविन्यात आली आहे.
दरम्यान संतप्त झालेल्या आंदोलकांनी गोदावरी पूलावरच ठान मांडून नगर-छ संभाजीनगर महामार्ग सकाळी नऊ ते दुपारी पाच आहे पण चार वेळा अडवला प्रत्येक वेळी सुमारे दहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला लागलेले होते सायंकाळी सहा वाजता अहमदनगर येथील महानगरपालिकेचे अग्निशामक दल पोहोचले त्यांनी नदी पात्र उतुरुन शोध सुरू केला होता
मराठा आरक्षणासाठी यापूर्वी काकासाहेब शिंदे यांनी याच ठिकाणी आरक्षणासाठी जलसमाधी घेतली होती या घटनेची ही पुनर्व आवृत्ती होते की काय अशी वाईट शंका सर्वांच्या मनात येत होती
दोन आंदोलकांचे स्टेटस– शेवटचा जय मल्हार मित्रांनो,, आम्ही असून नसू आता तुम्हाला बापू बिरू होण्याची वेळ आली या सरकारमुळे.. वेळ आलेली आहे आम्ही गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेत आहोत शेवटचा जय मल्हार
प्रल्हाद सोरमारे बाळासाहेब कोळसे
शोध पथकाला सापडला तिसराच -सायंकाळी सहा नंतर गंगापूर हद्दीमध्ये गंगापूर येथील वैभव करपे याचा सापडला त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
घटनास्थळी सायंकाळी अहमदनगर महापालिकेचे अग्निशमन पथक आले त्यांनी केलेल्या सर्च ऑपरेशन मध्ये कोणताही मृतदेह आढळून आला नाही केंद्रीय आपातकालीन सुरक्षा पथक बोलवण्यात आले असून ते रात्री उशिरा घटनास्थळी येणार आहे त्यानंतर पुन्हा शोध सुरू होईल- मा सुधीर पाटील प्रांताधिकारी



