spot_img
spot_img

आपली लढाई धनशकतीच्या विरोधात, वर्गणी काढून ज्यांना निवडून दिले त्यांनी साथ सोडली- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 

अकोले (जनता आवाज वृत्तसेवा):-  आपली लढाई धनशक्तीच्या विरोधात आहे.सगळ्या मार्गाने पैशे गोळा करणाऱ्याच्या विरोधात आहे. आपल्या समोरच्या उमेदवाराच्या मागे जे आहेत,त्यांनी लई गोळा केलं आहे.एकेका मतदार संघात पंधरा पंधरा – वीस वीस कोटी रुपये खर्च करण्याची त्यांची तयारी आहे.लोकसभेला हे सर्व वकरून झालं पण राज्यातील जनता हुशार आहे.अकोलेची जनता तर फारच हुशार आहे,पण तुमचा काही फायदा होत असेल तर आपली काही हरकत नाही.असे मिश्किलपने सांगत सकाळी मतदानाला जाताना मात्र तुतारीच फुंकायची हे लक्षात ठेवा असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे आज तालुक्यातील कोतुळ येथे आगमन झाले.यावेळी आ.जयंत पाटील, खा.डॉ.अमोल कोल्हे, खा. निलेश लंके,आ.सुनिल भुसारा यांची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

यावेळी पाटील यांनी अजितदादा गटात गेलेले विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता टीका केली. पाटील म्हणाले, ‘यावेळीही अकोल्यात महविकास आघाडीचे पारडे जड आहे. आपले सरकार असताना पश्चिम वाहिनी नद्या पूर्वेकडे वळवून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मधल्या काळात ते मागे पडले. सरकार आल्यावर ते पुन्हा सुरू केले जातील. तसेच तालुक्याचे विविध प्रलंबित प्रश्नही मार्गी लावले जातील.असे आश्वासन त्यांनी दिले.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आपल्याला राज्यातील महायुतीचे सरकार घालवायचे आहे असे सांगताना या सरकारचा भ्रष्ट सरकार असा उल्लेख करीत तिखट शब्दात सरकारवर टीका केली.

हे भ्रष्ट सरकार घालून आपल्याला शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारे, तरुणांच्या हाताला काम देणारे, आया बहिणींचे संरक्षण करणारे सरकार आणावयाचे आहे.

आ.पाटील यांच्या भाषणापूर्वी एका कार्यकर्त्याने उमेदवारी जाहीर करा अशी मागणी केली त्यामुळे आ पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.त्या सबंधित कार्यकर्त्याला उद्देशून पाटील म्हणाले की,या मतदार संघात कुणाला उभे करणार हे जर तुला कळले नसेल तर तुझ्या सारखा वेडा माणूस दुनियेत नाही.तुझ्या बुध्दीची कीव करतो,अशा भाषेत त्या कार्यकर्त्याला फटकारले.

आज स्व.अशोकराव भांगरे असते तर तेच आपले उमेदवार असते असे ते म्हणाले.आपल्याला आघाडी टिकवायची आहे त्यामुळे आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्या जागेंवर उमेदवारांची घोषणा केली जाईल असे ते म्हणाले.

यावेळी खा.डॉ.अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, महेबुब शेख,अमित भांगरे,सुनिता भांगरे, सुरेश गडाख,बी जे देशमुख,विनोद हांडे आदींची भाषणे झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.यावेळेला मोठे शक्तीप्रदर्षन करण्यात आले.

आ जयंत पाटील यांनी भाषणाला सुरुवात करताच एका कार्यकर्त्याने उमेदवारी जाहीर करा अशी जाहीर मागणी केली त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी असे असेल तर मी माझे भाषण थांबवतो असे म्हणून भाषण थांबविले व ते निघाले.शांत, संयमी जयंत पाटील यांचे हे रूप पाहून सर्वच जण आवाक झाले मात्र व्यासपीठावरील प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर पाटील यांनी पुन्हा आपल्या भाषणास सुरुवात केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!