नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा):- सोशल मीडियामध्ये पोलिसांच्या बदनामी प्रकरणी माऊली तोडमल रा.नेवासा बुद्रुक याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत माहिती अशी आहे की नेवासा तालुक्यात “पोलीस गुंडा ससाने हप्ते वसुलीत एक नंबर अनाधिकृत वसुली कृत्यामुळे प्रवरासंगम कार्यक्षेत्रात व्यावसायिक त्रस्त अँटीकरप्शन होण्याची लवकर शक्यता” अशा आशयाचा मजकूर व्हाट्सअप तसेच फेसबुक सोशल मीडियात पोस्ट करून पोलिसांची बदनामी केली. अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे मान, सन्मान, स्वाभिमान दुखावल्याची भावना निर्माण झाली असल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी दाखल केलेली आहे.
काही दिवसांपासून पोलिसांच्या विरोधात जनतेमध्ये अपप्रचार करणे,पोलिसांची बदनामी होईल अशा प्रकारची वक्तव्य करणे व प्रत्यक्ष अ-प्रत्यक्षरीत्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची भीती घालणे यासारखे वर्तन करीत असल्याचे पो. नि. धनंजय जाधव यांनी सांगितले.
जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचा नेवासा पोलीस प्रामाणिक आणि कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पोलिसांची नाहक बदनामी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.
.



