4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंचाचे काम -डॉ विखे पाटील शिर्डीत युवकांचा भव्य मेळावा संपन्न

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे. जात आणि धर्माच्या पलिकडे जावून युवकांच्या उज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल.विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन विकास आणि समाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डाॅ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जनसेवा युवा मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या युवक आणि युवतीच्या मेळाव्यात डाॅ सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचे महत्व विषद केले.वीस हजाराहून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यास उपस्थित होते.

युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुध्दा कार्यकर्ता म्हणून काम केले.माझ्या बरोबरच्या अनेक कार्यकर्त्याना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचे एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी.पण आता युवकांना आपल्याला संघटनेत जोडून घ्यायचे आहे.आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे या भागात विचारांच्या आधारावर विकास प्रक्रीया सुरू आहे.सहकार चळवळ आपल्या विकासाचा मुख्य पाया असून येणार्या काळात आता युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी अधिक काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पालक मंत्री ना.विखे यांच्या मार्गदर्शनात विकासाची प्रक्रीया पुढे जात आहे.महसूल मंत्री पदाच्या माध्यमातून शिर्डी येथे औद्यगिक वसाहत करीता जागा उपलब्ध झाल्याने मोठे उद्योग परीसरात येणार आहेत. तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून, अनेक उद्योग उभारणीसाठी माझ्या युवक मित्रांना संधी असल्याचे डॉ विखे म्हणाले.

आज केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योगाच्या मोठ्या योजना सुरू आहेत.स्टार्ट अप सारख्या उपक्रमातून ग्रामीण युवकांना संधी आहेत.आशा सर्व युवकांसाठी उद्योग प्रशिक्षणाचे केंद्र स्थापन करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

आपला शिर्डी विधानसभा मतदार संघाला साईबाबांचे आशीर्वाद आहेत.सबका मालिक एक हाच विचार त्यांनी आपल्याला दिला.त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिकून आहे.जनसेवा युवा मंच जात धर्माच्या पुढे जावून काम करणार असल्याने आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याची भूमिका डाॅ विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!