spot_img
spot_img

अकोले तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरला

अकोले (जनता आवाज वृत्तसेवा):- येथील बेलापूर गावात वाटाघाटीच्या वादात दिराने भावजयवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली,तर जाऊबाईला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेच्याही अंगावर कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली.

आज दुपारी उज्वला अशोक फापाळे वय ३५, आणि त्यांची जावबाई वैशाली संदीप फापाळे वय ४० यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याने बेलापुर सह पठार परिसर हादरला आहे. आरोपी दत्तात्रय उर्फ (बापू) प्रकाश फापाळे हा घटनास्थळाहून पसार झाला असून अकोले पोलिस घटनास्थळी पोहचले असल्याने पंचानामा सुरु असल्याचे समजते. हाती आलेल्या माहिती नुसार मयत उज्वला यांच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते, यानंतर उज्वला ही कामानिमित्त चाकण या ठिकाणी राहत होती, शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्वला ही घरी आली त्याचेवळी तिचा दिर आरोपी दत्तात्रय फापाळे हा भावजयला म्हणाला तुझ्या पतीसाठी मी खर्च केला आहे, ते पैसे माझे देऊन टाक तसेच शेतीच्या वादातून त्यांच्यात वाद वाढला… आणि आरोपीने कोयत्याने भावजय वर सपासप वार करत तिचा खून केला .

यावेळी मोठा आरडाओरडा झाल्याने भावकीतील वैशाली फापाळे या उज्वला यांना वाचवण्यासाठी मध्ये पडल्याने आरोपीने वैशालीवर देखील कोयत्याने वार करून दोघींचीही हत्या केली आहे. उज्वला हिला दोन लहान मुले आहेत, मुलांना तिने माहेरी ठेवले होते, त्यामुळं उज्वलाचे दोन लहान मुलं वाचली आहेत, मात्र भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या वैशाली फापाळे यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे.आरोपी दत्तात्रय फापाळे हा दुहेरी हत्याकांड करून पसार झाला असून हातात कोयता घेऊन जातानाचा त्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.पुढील तपास अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!