spot_img
spot_img

मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामार्फत बांगर कुटुंबीयांना आ खताळ यांच्या हस्ते दीड लाखाची मदत सुपूर्त

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील रायतेवाडीचे शेतकरी कुटुंबातील दिपक शांताराम बांगर यांचे नातू अद्विक अक्षय बांगर याचा खेळताना कुट्टीमशीनमध्ये डाव्या हाताची बोटं गेली होती. त्यास संगमनेर येथील डॉ पानसरे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. ही माहिती भाजपचे तालुका सचिव महेश मांडेकर यांनी राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री विखे, व आ अमोल खताळ यांना देत अद्विक या लहान मुलाच्या शस्त्र क्रियेसाठी मुख्यमंत्री साह्यता निधीतून मदत मिळावी अशी मागणी केली होती

अद्विक बांगर या मुलाच्या शस्त्रक्रिये साठी लागणारा सर्व खर्च जनसेवा मंडळा च्या मार्फत केला जाईल असा विश्वास दिला होता त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे,माजी खा डॉ सुजय विखे आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून बांगर यांच्या कुटुंबीयांना अद्वैकच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या खर्चाची दीड लाख रुपयांची रक्कम अद्विक बांगर यांच्या आई-वडिलांकडे रोख स्वरूपात प्रदान केली असुन त्यामुळे बांगर कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते बांगर परिवाराने मंत्री राधाकृष्ण विखे,माजी खा डॉ सुजय विखे आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत

 

 

 

 

.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!