कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा):-धार्मिक आणि सामाजिक कामांचा समृद्ध वारसा लाभलेले येसगाव येथील युवक वर्ग युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीत नेहमीच सार्वजनिक उत्सवात अग्रेसर असतात. येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या सर्व युवकांनी सकाळी उपस्थित राहून प्रगतीपथावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक केला, त्यानंतर विधिवत पूजन करून आरती झाली. गेल्या अनेक वर्षांची शिवजयंतीची परंपरा गाव जपून आहे.
डीजे, मिरवणूक यांना फाटा देऊन संध्याकाळी एकत्र जमून आरती, शोभेचे आतिषबाजी, छोटे-मोठे करमणुकीचे कार्यक्रम अथवा समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविले जातात.त्यानंतर प्रसाद म्हणून गोड पदार्थ अथवा फळांचे वाटप होते. माननीय विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठिंब्याने सुरू असणारे शिव मंदिराचे काम लवकरच पूर्ण करून महाराजांच्या विचारांचे पालन करण्यासाठी आदर्श म्हणून उभा राहणाऱ्या ह्या जागेतून समाज उपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबविण्याचा निर्धार याप्रसंगी छत्रपती प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी गावकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 624740