संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- विधान परिषद उपसभापती आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना नेत्या निलम गो-हे यांच्या विषयी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा संजयराऊत यांनी अपमानास्पद वक्तव्य केले .त्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने खा राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत त्या फलकाचे दहन केले.
आ अमोल खताळ यांच्या मार्गदर्शना खाली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर बसस्थानक प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खा संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना नेत्या निलम गो-हे यांच्याबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी आ अमोल खताळ यांच्या सुविध्य पत्नी निलम खताळ ,शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले,भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल ताजने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ तालुकाप्रमुख संगीता बांबळे शहरप्रमुख वैशाली तारे उपशहर प्रमुख मनीषा पंधारे या महिला पदाधि कार्यांनी खा संजय राऊत यांच्या प्रतिका त्मक फलकाला जोडेमारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.
खा संजय राऊत यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे ,तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे,रमेश काळे शहरा प्रमुख दिनेश फटांगरे , विनोद सूर्यवंशी राहुल खताळ ,बाळासाहेब राऊत,,सौरभ देशमुख , सुशील शेवाळे ,आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार,भाजपतालुका सचिव महेश मांडेकर, लहुजी शक्तीसेनेचे अध्यक्ष मंजाबापू साळवे निसार शेख बबलू काझी वरद बागुल संदेश देशमुख सुयोग गुंजाळ सुयोग जोंधळे गणेश आंबरे मज्जू जागीरदार यांच्यासह महा युतीच्या कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांचे फलक जमिनीवर तुडवत त्याचे दहन केले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कायमच महिलांचा सन्मान केला गेला. मात्र खा संजय राऊत यांच्या सारखे मागच्या दाराने येऊन खा झालेले नेते छत्रपतींच्या महाराष्ट्रातील महिलांचा जर अपमान करत असेल किंवा त्यांच्या विषयी अपमानास्पद बोलत असेल ते निषेधार्य असल्याचे परखड मत यांनी आ अमोल खताळ यांच्या धर्मपत्नी निलम खताळ ,शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले,भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल ताजने यांनी व्यक्त केले
संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खा संजय राऊत यांनी शिवसेनेच्या उपनेते आणि विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य करून महाराष्ट्रा तील महिलांच्या भावना दुखावल्याआहेत अशा या राऊत यांना महायुती कधी ही भीक घालणार नाही असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे,तालुकाप्रमुख रमेश काळे राजेंद्र सोनवणे ,शहरप्रमुख दिनेश फटांगरे व ,विनोद सूर्यवंशी आरपी आयचे शहर अध्यक्ष कैलास कासार भाजपचे तालुका सचिव महेश मांडेकर आणि लहुजी सेनेचे अध्यक्ष मांजाबापू साळवे यांनी दिला आहे.




Total Users : 623185