राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डीकडून राहात्याकडे येणाऱ्या भरधाव वेगाच्या कारने हॉटेलची संरक्षण भिंतीला जोराची धडक दिल्याने कारने दोन पलट्या मारल्याने अपघातात चार चाकी वाहनाचा चक्काचूर झाला. ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजता घडली. देव बलवत्तर होते म्हणून सुदैवाने या अपघातात चार चाकी वाहनात बसलेल्या एक युवक व युवती हे दोघे बचावले असून त्यांच्यावर शिर्डीतील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे .
याबाबत माहिती अशी की गूरवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजे दरम्यान राहाता शहरातील एक युवक व एक युवती कार मध्ये बसून शिर्डी कडून राहात्याकडे येत असताना कार चालवत असलेल्या युवकाचा कार वरील ताबा सुटल्याने भरधाव वेगाने नगर मनमाड रोड वरून जाणाऱ्या एम.एच २० -२५२४ होंडा कंपनीच्या कारने साकुरी शिवरात असणाऱ्या हॉटेल गारवाच्या संरक्षण भिंतीला जोरदार धडक दिली. चार चाकी वाहनाची धडक प्रचंड वेगाने बसल्याने कारने भिंत तोडून दोन पलट्या खाल्ल्या कारचा वेग ज्यादा असल्याने या चार चाकी वाहनाचा अपघातात प्रचंड नुकसान झाले असून अपघाताने झालेल्या या वाहनाची परिस्थिती पाहून या अपघातात कोणी बचावले नसेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला.
परंतु सुदैवाने या गाडीत बसलेले राहाता शहरातील एक युवक व एक युवती यांना किरकोळ दुखापत झाली . अपघातानंतर त्याना तात्काळ शिर्डी येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री कारनै या संरक्षण भिंतीला जोराची धडक दिल्याने मोठा आवाज झाला त्यामुळे शेजारी असणाऱ्या नागरिकांनी तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी अपघात झालेल्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. सदरची घटना ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाल्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. वेगाने कार चालवणारा युवक व कार मध्ये बसलेली युवती कोण याबाबत राहाता शहरात संपूर्ण दिवस चर्चा सुरू होती. या घटनेनंतर राहाता पोलिसात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शिरसाठ हे या घटनेचा तपास करीत आहे.




Total Users : 624728