spot_img
spot_img

विद्यार्थ्यांनी परिस्थितीला जिद्दीने सामोरे गेले पाहिजे – माजी विद्यार्थी आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील आपल्या विद्यार्थी जीवनाला प्रवरेकडून मिळालेली दिशा आठवणींना दिला उजाळा

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-विद्यार्थ्यांनी परिस्थितीला जिद्दीने सामोरे गेले पाहिजे. प्रवरे मुळे घडलो आणि आज सक्षमपणे उभा राहिलो यामध्ये प्रवरेचा वाटा महत्त्वपूर्ण आहे.या संस्थेने ग्रामीण शिक्षणाचा पाया भक्कमपणे टिकवून ठेवला असल्याचे गौरवोद्गार संस्थेचे माजी विद्यार्थी आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काढले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम मंत्री जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यानिमित्ताने वस्तीगृहाच्या इमारतीचे भुमीपूजन त्याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी विद्यार्थी व माजी आमदार नितीन भोसले लान्सन अँड टर्बो कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी अरविंद पारगांवकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, संस्थेचे संचालक दत्ता पाटील भाऊसाहेब ज-हाड, माजी विद्यार्थी श्याम मिसाळ, विक्रम शिंदे राजेश भाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डाॅॅ. व्ही आर. राठी, प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने आदींसह सर्व विभाग प्रमुख विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. मकरंद जाधव पाटील म्हणाले की पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारातून ग्रामीण परिवर्तनाचा आदर्श निर्माण केला आहे आज शहरी भागामध्ये अनेकांनी संस्था काढल्या परंतु प्रवरा शैक्षणिक संकुल हे ग्रामीण भागातील एकमेव संकुल आहे की, ज्या संकुलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कष्टकरी शेतकरी आणि सामान्य जनतेच्या मुलांना शिक्षणातून मोठा आधार मिळाला.ग्रामीण शिक्षणाचा पाया संस्थेने मजबूत केल्यामुळेच माझ्या सारख्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महाविद्यालयाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनो नवनवीन तंत्रज्ञान अवगत करत असतानाच विविध शिक्षणातून आपण जिद्दीने पुढे गेले पाहिजे शिक्षणाबरोबरच आपण मैदानी खेळाला महत्व देण्याचे आवाहन करून मनाची एकाग्रता आणि आयुष्यातील जय पराजय आपल्याला मैदानावरच समजतो.आपणच देशाचे आधार स्तंभ आहात नवी आव्हान स्विकारून आपल्याला पुढे जायचे आहे.विखे पाटील परीवाराची चौथी पिढी सहकार आणि शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देत असल्याचा अभिमान व्यक्त करून जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना महाविद्यालयात असताना पाहाण्याचा योग आला.अतिशय साधी राहाणी आणि मोठा विचार घेवून त्यांनी या भागात काम उभे केले, यामागे मोठी दूरदृष्टी असल्याचे जाधव म्हणाले.

जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा शैक्षणिक संस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू असून या परीसरात झालेला बदल ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अरविंद पारगांवकर यांनी भारत हा तरुण देश आहे तरुणांना नवनवीन तंत्रज्ञान देण्यामध्ये प्रवरा संस्था महत्त्वपूर्ण काम करीत असून, या माध्यमातून प्रवरेचा विद्यार्थी हा प्रत्येक गोष्टीत पुढे असल्याचे समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी चाणक्य असले पाहिजे आणि चाणक्य बुद्धीतून पुढे गेले पाहिजे येणाऱ्या काळात मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी आणि आहिल्या नगर या ठिकाणी होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार असून, रोजगार निर्मितीसाठी लार्सन अँड टर्बो कायम आपल्या सोबत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न घडावा यासाठी प्रवरेच्या माध्यमातून काम होत असल्याचे सांगून, यासाठी वेगवेगळे उपक्रम प्रवरेच्या माध्यमातून सुरू आहेत. आव्हानावर मात करून प्रवरेचा विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे सांगितले.

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध सुविधांचा उपयोग करून पुढे जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी प्राचार्य डॉ. व्ही आर. राठी यांनी वार्षिक अहवाल वाचन करत करताना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. महाविद्यालयातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र काकडे यांनी केले.

सहकारी साखर कराखानदारीचा जन्म या भूमीत झाल्याचा उल्लेख करून,मी सुध्दा बंद पडलेले दोन सहकारी साखर कारखाने लोकांच्या मदतीने चालावायला घेतले.आज कारखाने यशस्वीपणे सुरू आहेत.केवळ सहकारी कारखानदारी टिकावी हाच विचार यामागे होता असे त्यांनी ठामपणे सांगितले. होस्टेलला असताना केक विक्रीसाठी येत.त्याची चोरी उपस्थित असलेल्या माजी आमदार नितीन भोसले यांच्या साक्षीने कशी करायचो याचा किस्सा सांगून मंत्री जाधव यांनी महाविद्यालयातील आठवणीना उजाळा दिला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!