नवी मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- गांधी हॉस्पिटल सेवा निवृत्त महिला सेविकांच्या सातव्या वेतन आयोगा मिळावा या मागणीसाठी प डॉ विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने ना डॉ राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले.
प. डॉ. वि. विखे पाटील कृषी परिषदेच्या मुंबई अध्यक्षा सौ अनुजा साळवी यांनी गांधी हॉस्पिटल मधील सेवा निवृत्त महिला कर्मचाऱ्यांच्या सातवा आयोगाप्रमाणे मानधन मिळवा या मागणीसाठी सेवा निवृत्त महिला सेविकांच्या शिष्टमंडळानेचे जलसंपदा मंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.
कृषी परिषदमार्फत अनेकदा संबधित आरोग्य विभाग तसेच गांधी हॉस्पिटल मध्ये या विषयाचा पाठपुरावा अनेकदा केला आहे .
आरोग्य मंत्रालय, राज्य कामगार विमा योजना आयुक्त, महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल अधीक्षक आणि अकाउंट डिपार्टमेंट यांचा देखील पाठपुरावा करण्यात आला. एरियसचा लाभ मिळावा म्हणून जुलै-२०२४ पासून आपल्या सहकार्यातून पाठपुरावा करीत आहे. मला संबंधित अधिकारी आणि कार्यालय यांस कडून दिशाभूल आणि टाळाटाळीची उत्तरे मिळत आहेत.
सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प डॉ विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने विनंती केली आहे .