गुहा (जनता आवाज वृत्तसेवा):- कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अतुल कोळसे,उपाध्यक्षपदी रविंद्र डौले तर खजिनदारपदी अनिल सौदागर यांची निवड करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव मंगळवार दि.18 मार्चपासून ते गुरुवार दि.20 मार्च पर्यंत संपन्न होणार आहे.
यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतुल दत्तात्रय कोळसे उपाध्यक्षपदी रवींद्र बाळासाहेब डौले तर खजिनदारपदी अनिल सौदागर यांची निवड करण्यात आली आहे.या यात्रा उत्सवासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नाथ भक्त दर्शनासाठी येतात.
मंगळवार 18 मार्च रोजी मानाचा नैवेद्य व काठी मिरवणूक बुधवारी 19 मार्च रोजी सकाळी होम हवन गंगाजल पूजन व कावड मिरवणूक त्यानंतर दुपारी महाआरती होईल व सायंकाळी रात्री आठ ते 11 सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी दुपारी तीन ते चार या वेळेत सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत भव्य कुस्ती हंगामा व त्यानंतर सायंकाळी महाआरती होऊन सायंकाळी आठ वाजता नाथभक्त आकाश शिंदे यांचा नाथ गीतांचा कार्यक्रम होणार असून या निमित्ताने हिंदू धर्मरक्षक राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग उपस्थित राहणार आहेत.
मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई पार्किंग तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठीदर्शन रांगेची व्यवस्था केली जात आहे. विविध प्रकारचे दुकाने यामध्ये फुल हार खेळणी खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसाधने गृह उपयोगी साधने आदी दुकाने थाटली जात आहेत.
यात्रा कमिटी पुढीलप्रमाणे खजिनदार अनिकेत दादासाहेब कोळसे सचिव मच्छिंद्र बाळासाहेब आंबेकर सहसचिव अमोल सुरेश भांड कार्यक्रम व्यवस्थापक सचिन बाळासाहेब लांबे मंदिर व्यवस्थापन साईनाथ सतिष पवार सह मंदिर व्यवस्थापन वैभव अण्णासाहेब लांबे सदस्य- योगेश राऊत सागर काकडे गौरव वाघ पोपट शिंदे सागर काकडे मंगेश काकडे गौरव डवले सागर खपके सुनील तारू अजय मांजरे वैभव शिंदे राहुल उऱ्हे मुकेश चंद्रे अमुल कोळसे शंकर वाबळे हर्षद कोळसे अशोक कोळसे रुपेश सौदागर सचिन खपके योगेश वरपे बाबू कुचेकर संतोष खराडे बाळासाहेब जगताप महेश शिंदे बाळासाहेब काकडे रामा मदने सागर लांबे मंगेश गवांदे संकेत कोळसे यांची निवड करण्यात आली. शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी श्रीफळ वाढून यात्रेस प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी सुजित वाबळे अविनाश ओहोळ नंदू सौदागर नानासाहेब चंद्रे शरद कोळसे शिवाजी मांजरे शरद वाबळे राम बर्डे विजय वाबळे चंद्रकांत थोरात लहानु कोळसे दत्तात्रय शिंदे हरी आंबेकर अनिकेत गांगुर्डे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व कानिफनाथ भक्तांनी दर्शनाचा व यात्रा कालावधी मधील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान विश्वस्त कमिटी,यात्रा कमिटी व गुहा ग्रामस्थांनी केले आहे.