कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील कोल्हार बु. येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालयातील चार शिक्षिका श्रीमती आंधळे संजीवनी भीमराव (प्र. मुख्यध्यापिका), श्रीमती कडू सविता संपत, श्रीमती पठाण सलमा समशेर, श्रीमती कडू जयश्री दिलीप यांना संगमनेर येथील विद्या विद्यापीठ संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
संगमनेर येथील विद्या विद्यापीठ संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्याची दखल घेऊन विद्यार्थी ज्ञानदानाप्रती घेतलेल्या अथक परिश्रमामुळे आदर्श शिक्षिका म्हणून ही निवड करण्यात आली आहे. नुकताच महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका पद्मश्री कल्पनाताई सुरज यांच्या शुभहस्ते सौ दुर्गाताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरयू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्यांचे निवडीबद्दल
विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक शब्बीर शेख रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.अरुण कडू पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. अॕड. सुरेन्द्र खर्डे पाटील, जनरल बॉडी सदस्य श्री. रावसाहेब म्हस्के पा., सदस्य अजीत मोरे, बी.के. खर्डे पा. , अशोक शेट आसावा,पांडूरंग देवकर पा., संजय शिंगवी, विभागीय अधिकारी मा बोडखे साहेब. सहाय्यक विभागीय अधिकारी मा. .नाईकवाडी साहेब, मा.तोरणे साहेब तसेच सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.