कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- आज श्रीक्षेत्र कोल्हार येथील राजुरी रोडवर स्थित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये असंख्य स्वामी सेवेकरांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा साजरा झाला.
सकाळी 8.30 ची भूपाळी आरती होऊन त्या नंतर सकाळी ठीक 10.30 च्या नैवेद्य आरतीनंतर सामूहिक श्री स्वामी समर्थ महाराज जप तसेच सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ वाचन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली,असंख्य भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.
पाठ वाचनानंतर सामूहिक औदुंबर प्रदक्षणा करत या सोहळ्याची सांगता झाली. यावेळीस्वामी सेवेकरी सुधीर खर्डे,विजय डेंगळे, शेळके सर,गणेश सोमवंशी, सावंत साहेब, पल्लवी ताई धनवटे, लताताई रोकडे,काळेताई, सुनीताताई भनगे, कल्पनाताई नेहे आदी उपस्थित होते.




Total Users : 636771