spot_img
spot_img

बेलापूर येथे प्रवरा नदीपात्रात आढळले कोंबड्यांचे अवयव परिसरात खळबळ, चौकशी करून कारवाईची मागणी

बेलापूर (जनता आवाज वृत्तसेवा):- प्रवरा नदीपात्रात कोणीतरी अज्ञात इसमाने पाणी दूषित व्हावे या उद्देशाने कोंबड्यांचे अवयव मोठ्या प्रमाणात टाकून दिले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरीकामधुन चीड व्यक्त केली जात आहे . या प्रकराची पोलिसांनी कसून चौकशी करून संबंधितावर प्रदूषण कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीकाकडून केली जात आहे. 

शेतकऱ्यांना शेतीसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून जलसंपदा मंत्री नाम.राधाकृष्ण विखे पा. यांनी प्रवरा नदीवरील बंधारे भरून दिले.बंधारे पुर्ण क्षमतेने भरली असुन शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच प्रवरा नदीच्या पुलावरून कोणीतरी अज्ञात इसमाने मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची पिसे, तुटलेले मुंडके व अवयव पुलावरून प्रवरा नदीत टाकून दिले होते.

सदर बाब सकाळी देवदर्शनासाठी जात असताना बेलापूरपूरचे माजी सरपंच भरत साळुंखे व पिंटू मुंदडा यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने पत्रकार देविदास देसाई यांच्याशी संपर्क साधला. पत्रकार देविदास देसाई राधेश्याम अंबिलवादे, सचिन देवरे हे तातडीने प्रवरा नदीच्या पुलावर आले. त्यावेळी पाण्यावर मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची पिसे तुटलेले मुंडके व इतर अवयव तरंगत असताना आढळून आले त्याचवेळी तेथुन परिवार चिकन मटन शॉप चे मालक हुसेन भाई पठाण जात होते. श्री.देसाई यांनी घडलेला निंदनीय प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी देखील सामाजिक भान ठेवून तातडीने दोन व्यक्तींना बोलावून घेतले व ती सर्व नदी पात्रातील घाण पोत्यात भरून तीची विल्हेवाट ला्वली.

सदर प्रकाराबद्दल परिसरात खळबळ उडाली आहे. बेलापूरच्या कोल्हार रोड चौकात मटणचिकन व्यवसायाची अनेक दुकानें आहेत. तसेच रविवारच्या बाजारातही बाजारातळावर अनेक मटन, चिकन, मासे व्यावसायिक दुकानें थाटतात. हे व्यावसायिक मटण, चिकन, मासे आदींचे अवशेष इकडे तिकडे टाकतात. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने ह्या व्यवसायिकांना वेळीवेळी नोटीसाही बजावल्या आहेत. बाजारातळावर मटन, चिकन. मासे आदीच्या मांसाचे अवशेषामुळे नजिकच्या दशक्रिया विधीच्या घाटावर विधीच्या ठिकाणी कावळे फिरकत नाहीत. त्यात आता थेट नदीपात्रात मांसाचे अवशेष टाकल्यामुळे परिसरात प्रचंड चीड व्यक्त होत आहे.

या प्रकाराची कसून चौकशी व्हावी आणि दोषीवर प्रदूषण कायद्यान्वये कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी पोलिसांकडे पत्राद्वारे या प्रकारणी गुन्हा दाखल करून दोषीवर कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनी तपास करण्याबाबत सांगितले तथापि पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई झाली हे अद्याप समजू शकले नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!