संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-जागतिकीकरणामुळे जग अगदी जवळ आले आहे. आपल्या देशात ज्या वस्तू तयार होत नाहीत त्या वस्तू इतर देशांमधून सहज उपलब्ध होत आहेत, तसेच आपल्या देशात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त वस्तू आपण इतर देशांमध्ये विक्रीस घेऊन जाऊ शकतो.
याच संधीचा विद्यार्थ्यांना फायदा घेता यावा याकरिता संगमनेर येथील डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फौंडेशनच्या वृंदावन कृषी महाविद्यालयाने 2 जून ते 7 जून या कालावधीत 6 दिवसांची आयात निर्यात कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना समृद्धी बिजनेस अकॅडमी चे संचालक राहुल खरातमल यांनी आयात- निर्यात संबंधित सर्व पैलूंचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन प्रशिक्षण दिले.
संस्थेचे सचिव मा. राहुल गुंजाळ यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांकरिता सतत अश्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ प्राध्यापक डॉ. जयसिंग लामटुळे व इतर शिक्षकांनी या कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केले.




Total Users : 599576