पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- पारनेर तालुका भाजपचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांच्यावर खासदार निलेश लंके समर्थक वाळवणे गावचे माजी सरपंच सचिन पठारे यांनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मनोज मुंगसे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, राहुल पाटील शिंदे यांनी गेल्या वीस वर्षांपासून सुपा आणि परिसरात गोरगरीब जनतेची निस्वार्थ सेवा केली आहे. शेतकरी, दूध उत्पादक आणि सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या आजोबांपासून ते वडिलांपर्यंत, शिंदे कुटुंबाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. राहुल पाटील शिंदे यांनी नेहमीच सामान्य माणसाला मदत करण्याला प्राधान्य दिले आहे.
मनोज मुंगसे यांनी सचिन पठारे यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले की, ज्या व्यक्तीला नीट भाषणही करता येत नाही, त्याने राहुल पाटील शिंदे यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. त्यांनी पाठांतर करून टीका केली असावी, कारण त्यांच्याकडे स्वतःचे ज्ञान नाही. मुंगसे यांनी प्रश्न उपस्थित केला की, वाळू तून पैसा कमावणाऱ्या या व्यक्तीने कधी गोरगरीब जनतेची सेवा केली आहे का? त्यांनी कमावलेल्या पैशातून सामान्य लोकांसाठी काय योगदान दिले? तसेच, ज्या नेत्यांची बाजू ही व्यक्ती मांडत आहे . मनोज मुंगसे यांनी ठामपणे सांगितले की, राहुल पाटील शिंदे हे शेती आणि कष्टातून पैसा कमावतात. त्यांना चोरी किंवा लबाडीने पैसे कमावण्याची गरज नाही. स्वाभिमानाने आणि ताठ मानेने राजकारण करणारे राहुल पाटील शिंदे हे गोरगरीबांचे खरे नेते आहेत. वाळू वाल्यांनी त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून स्वतःची पातळी दाखवली आहे, त्यांनी स्वतःची उंची आधी तपासावी असेही मुंगसे म्हणाले.