अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- आ. संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे. माझ्या संकट काळामध्ये साथ देणारा सच्चा मित्र देखील आहे. अबू आझमीला बोलण्याची परवानगी असेल तर आ. संग्राम जगताप यांना हिंदुत्वावर बोलण्याचा हक्क आहे. महाराष्ट्रात संपूर्णपणे गोहत्या बंदी झाली पाहिजे आणि महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. लोकसभेचे व्होट जिहादचे उत्तर विधानसभेत हिंदूंनी एकत्रित येऊन दिले आहेत, आपल्या जमिनी आणि मंदिरे आपल्या नावावर करण्यासाठी संघटित होऊन लढा देण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. मी आता हळूहळू हिंदुत्वाकडे चाललो आहे. आणि संग्राम जगताप माझ्यापुढे गेले आहे. आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे काम माझे आहे. असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आ. संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने महासभा संपन्न झाली. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील, ह भ प संग्रामबापू भंडारे, मंदार बुवा रामदासी अजिनाथ महाराज पालवे, राजेंद्र जंजाळ, रवी पडवळ,भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संपत बारस्कर, माजी सभापती अविनाश घुले, आदींसह सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह भ प संग्राम बापू भंडारे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचे काम सुरू केले असून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून समर्थन मिळत आहे. जिहादी लोकांना आजहीअसे वाटते की काँग्रेस सरकार आहे. त्यांना माहीतच नाही आता हिंदूंचे सरकार आले आहे. जसा अयोध्येचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला आहे. तसाच देशातील इतर मंदिरांचा देखील निकाल हिंदूंच्या बाजूनेच लागेल, आता निकाल लागेपर्यंत वाट कशाला पाहिची त्यावर भगवा लावून टाका, आमदार संग्राम जगताप यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या जिहादी लोकांना धडा शिकवा लागणार आहे. जिथे जिथे हिंदूंची मंदिरे आहेत तिथे तिथे भगवेझेंडे लावली जातील. रामराज्य निर्माण करण्यासाठी हिंदूंनी एकजूट दाखवावी, असे ते म्हणाले.
सागर बेग म्हणाले की, खासदार निलेश लंके हे मुल्ला असून त्याला संसदेत पाठवले आहे, जिथे जिथे गोरक्षकावर गुन्हे दाखल झाले आहे, तिथे या मुल्लाने पोलिसांना फोन केले आहे. या मुल्लाने संसदेमध्ये वक्त बोर्डच्या बाजूने मतदान केले आहे. आपण सर्वांनी पुढील लोकसभेमध्ये हिंदुत्ववादी उमेदवाराला निवडून आणले पाहिजे, यापुढील काळात या मुल्ला लोकांना हिंदुत्ववादी लोकांनी कार्यक्रमाला देखील बोलू नये, भैया विरोधात बोलणाऱ्यांना दांड्याने ठोका या पुढील काळात आपल्याला आता युद्ध करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.
आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ आयोजित सकल हिंदू समाजाच्या सभेनंतर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. ह. भ. प. संग्राम बापू भंडारे, सागर बेग, मंदारबुवा रामदासी, अजिनाथ महाराज पालवे, राजेंद्र जंजाळ आणि रवी पडवळ या मान्यवरांनी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली




Total Users : 640461