spot_img
spot_img

महावितरणच्या खांबांवर पुन्हा इंटरनेट केबलचे जाळे ‘जनता आवाज’च्या पाठपुराव्यानंतर हटविलेल्या केबल पुन्हा टाकण्यास सुरुवात; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-महावितरणच्या विद्युत खांबांवर टाकण्यात आलेल्या इंटरनेट केबलच्या जाळ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही काळापूर्वी महावितरणच्या खांबांवर मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या इंटरनेट केबलमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘जनता आवाज’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महावितरणकडून अशा केबल हटविण्याची कारवाई करण्यात आली होती.

ही कारवाई होऊन काही काळ लोटताच नेवासा शहरासह परिसरातील काही भागांमध्ये पुन्हा महावितरणच्या विद्युत खांबांवर इंटरनेट केबल टाकण्यात येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांबांवर एकापेक्षा अधिक केबल बांधण्यात आल्याने पुन्हा केबलचे जाळे निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत ‘जनता आवाज’कडे पुन्हा तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!