29.8 C
New York
Sunday, June 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिवसेना उबाठा गटाला खिंडार,मधुकर तळपाडे शिंदे गटात

अकोले (जनता आवाज वृत्तसेवा):- अकोले विधानसभेची शिवसेनेकडून दोनदा निवडणूक लढविलेले व आताची विधानसभा अपक्ष लढवलेले माजी पोलीस अधीक्षक मधुकर तळपाडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला. यामुळे अकोले तालुक्यात शिवसेना शिंदे पक्षाची ताकद वाढली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे, डॉ. जालिंदर भोर, उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ,महिला आघाडीच्या राज्य सचिव शर्मिला येवले, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख तालुकाप्रमुख सुशांत गजे, तालुका कार्याध्यक्ष जगन देशमुख, तालुका सहसचिव सुभाष येवले, अकोले इ गटप्रमुख प्रकाश पाचपुते आदी उपस्थित होते.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. जालिंदर भोर यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या पक्षबांधणीत विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्वी माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ मधुकर तळपाडे यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पोलीस अधिकारीपदाचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या तळपाडे यांनी 2009 व 2014 मध्ये शिवसेनेतर्फे अकोले विधानसभेची निवडणूक लढवली होती. चांगली मते मिळूनही तिरंगी लढतीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांचा पक्ष प्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळकटी आणणारा असा आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!