मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा) :- दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची चर्चा विधानभवन परिसरात होत आहे. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात जात असताना रेड कार्पेटरवरच नाव न घेता घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकरांना डिवचलं होतं. आता, या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अशातच काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंड पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आम्हाला याच्यापेक्षा जास्त पुरावा देण्याची गरज नसल्याचे आव्हाड म्हणाले. जर तुम्ही विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल तर असे म्हणत आव्हाड यांनी सरकारवर टीका देखील केली.