प्रतिनिधी किरण शिंदे
वाकडी(जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते,दलीत चळवळीत मोठे योगदान असलेले आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच दुःखद निधन झाले. सोमवार दि 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता राहाता तालुक्यातील वाकडी येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब व पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री,आमदार खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत राजाभाऊ कापसे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नेहमी सामाजिक चळवळीत असलेले राजाभाऊ कापसे यांनी गेली 25 ते 30 वर्षापासून अन्याय विरूद्ध आवाज उठवून लोक हक्कासाठी, सामाजिक विषयावर आंदोलन केले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या सोबत राजाभाऊ कापसे यांनी चळवळीत भाग घेतला होता ना रामदासजी आठवले साहेब यांचे ते विश्वासू सहकारी होते जन्मभूमी असलेल्या वाकडी गावात व श्रीरामपूर शहरासह खेड्यापाड्यात राजाभाऊ कापसे यांनी आरपीआयच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले गोरगरिबांना वेळोवेळी मदत केली, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी राजाभाऊ कापसे यांनी मोफत अन्नदान केले,गरजू व्यावसायिकांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली अगदी लहान थोरापर्यंत राजाभाऊ कापसे यांनी आपली कार्यशीलता जपत कौतुकाची थाप मिळविली.आरपीआय पक्षाच्या माध्यमातून दहा वर्षात मोठे संघटन तयार करून गाव देश व पक्षहिताचे काम राजाभाऊ कापसे यांनी केले. एक होतकरू, लढाऊवृत्ती,नेहमी चळवळीत सहभाग असणारे व्यक्तिमत्व राजाभाऊ कापसे यांच्या निधनाने दलीत चळवळीचे मोठे नुकसान झाले असून राजाभाऊ कापसे यांच्या दुःखद निधनाबाबत नातेवाईक, आरपीआयचे पदाधिकारी,आप्तेष्ट, हितचिंतक व परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले.




Total Users : 619202