spot_img
spot_img

कोल्हारमध्ये प्रथमच बाप्पाच्या भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन  स्वामी विवेकानंद तरुण मंडळाचा पुढाकार; ७ ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणूक

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):- स्वामी विवेकानंद तरुण मंडळ, कोल्हार बुद्रुक यांच्या वतीने यावर्षी गावात प्रथमच गणपती बाप्पाच्या भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मुंबईची परंपरा आता कोल्हारमध्ये’ या संकल्पनेतून रविवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

सन २०११ मध्ये स्थापन झालेल्या स्वामी विवेकानंद तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृतीपर उपक्रम आणि महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल दिवेकर, वैष्णवी चव्हाण, खजिनदार युवराज जंगम तसेच मंगेश वादे, आदित्य चव्हाण, दीपक डंक, संकेत कापसे, वैभव कोळपकर, शुभम पांडे, अक्षय वादे, प्रथमेश मदने, यश जोशी, वैष्णव टापसे, दर्शन मदने आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!