श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील मोकळ्या मैदानांवर आणि सार्वजनिक ठिकाणांवर विनाकारण रेंगाळणाऱ्या, तसेच मद्यपान करणाऱ्या समाजकंटकांवर श्रीरामपूर पोलिसांनी मंगळवारी रात्री मोठी कारवाई केली. रात्री आठ ते दहा या वेळेत अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर पोलीस निरीक्षक यांनी विशेष ही कारवाई पार पाडली.
शहरातील थत्ते मैदान आणि महाले पोद्दार शाळेसमोरील क्रिकेटचे मैदान या परिसरांना पोलिसांनी अचानक लक्ष केले.या ठिकाणांवर विनाकारण बसून असणारे आणि उघडपणे मद्यपान सेवन करणाऱ्या सुमारे ३२ व्यक्तींवर आणि त्यांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान श्रीरामपूर शहरातील गोंधवणी तसेच बाहेरील (आऊटसाईडर) भागातून अनेक तरुण या मैदानांवर केवळ गप्पा मारण्यासाठी किंवा मद्यसेवनासाठी येत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या सर्व संबंधितांवर कायदेशीर बडगा उगारला आहे. थत्ते मैदानावर तपासणी करत असताना, काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) असलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रात्रीच्या वेळी या मैदानांवर कुटुंबासह फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आणि महिलांना या हुल्लडबाज तरुणांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. परिसरातील वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहेत.




Total Users : 628613