spot_img
spot_img

सुजय पर्वाला राहत्याचा सलाम गर्दी व रसिक प्रेमींनी दिलेले प्रेम आणि प्रतिसाद मी कधीही विसरू शकणार नाही- कवी अनंत राऊत डॉ. सुजय विखे पा. यांच्या वाढदिवसानिमित्त राहत्यामध्ये काव्यमैफील रंगली

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा):- आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अर्थात विखे पाटील परिवाराची समाजकारण व राजकारणाची मोठी परंपरा आहे ती परंपरा व संस्कार जपणारे न्यूरोसर्जन डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांचं अतूट प्रेम आहे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांनी माझे व्याख्यान व काव्यमैफलीचे आयोजन केले या कार्यक्रमादरम्यान राहाता शहरवासीयांनी केलेली गर्दी व रसिक प्रेमींनी दिलेले प्रेम आणि प्रतिसाद मी कधीही विसरू शकणार नाही.असे प्रतिपादन ख्यातनाम कवि गझलकार तथा व्याख्याते कवी अनंत राऊत यांनी केले

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन या डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता शहरातील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरासमोरील प्रांगणात मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता राहाता नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित ख्यातनाम कवी अनंत राऊत यांच्या काव्य मैफलीचा कार्यक्रम संपन्न झाला काव्यरसिक प्रेमींनी मैदान गर्दीने भरून गेले होते कधी शिट्ट्या फुकून तर कधी टाळ्या वाजून हातवारे करत नागरिकांनी काव्य मैफिलीला भरभरून प्रतिसाद दिला व डॉ.सुजयदादा विखे पाटील यांचा वाढदिवस मोठा उत्साहात साजरा केला साहित्य कला आणि समाज जीवनाचे वास्तव दर्शवणारे व मनाची संवेदनशीलता जागरूक करणाऱ्या कवितांचे श्रवण करताना काव्य मैफिल क्षणात हास्य मैफिलीत रंगली आणि काव्य रसिक श्रोते पोट धरून हसत राहिले कवी अनंत राऊत यांनी ग्रामदैवत वीरभद्र महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर व्यासपीठावर त्यांचे राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर उपनगराध्यक्ष विजयराव सदाफळ गटनेते शफिक उर्फ मुन्नाभाई शाह यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका व व्यासपीठावरील मान्यवरांनी राऊत यांचे स्वागत केले.

याप्रसंगी प्रास्ताविकात नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर म्हणाले की आमचे प्रेरणास्थान तथा मार्गदर्शक राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ सुजय  विखे पाटील आणि सौ धनश्री विखे पाटील यांच्या संस्कार व शिकवणूकीतून कार्यकर्ता घडत असतो डॉ.सुजय विखे पाटील हे आम्हाला अथवा कुठल्याही कार्यकर्त्याला अगदी मित्रा प्रमाणे कुटुंबातील सदस्या सारखे सांभाळतात दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोय या वाढदिवसाचे औचित्य साधून कवी अनंत राऊत यांच्या काव्य संध्या मैफिलीचे कार्यक्रमास डाॅ सुजयदादा प्रेमी व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आपणा सर्वांचे मानावे तितके आभार थोडेच आहे या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष गटनेते सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच शहरातील विविध संस्था संघटना मंडळ व नागरिकांनी दिलेले योगदान आमच्यासाठी अतुलनीय व अविस्मरणीय आहे यावेळी कव अनंत राऊत यांचा

नगरसेवक ॲड मयूर पाळंदे यांनी परिचय करून दिला तर नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतात अनंत राऊत यांची गाजलेली महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता तुपे यांनी आपल्या पहाडी आवाजात त्यांना ऐकवली या कार्यक्रमाप्रसंगी रसिकांची हाउसफुल गर्दी होती

संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत कबीर संत गाडगेबाबा राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजा संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले माॅं जिजाऊ यांच्यासह सर्वच महामानवांना वंदन करून काव्य मैफलीला सुरुवात केली. माय बाप… दुःख अडवायला उंबऱ्यासारखा.. मित्र वनव्यात गारव्यासारखा… जरी भुललीस तू… तुला चोरून पाहीन मी.. आई-वडीलच आपले दैवत आहे यासह सादर केलेल्या कवितांनी अनेकाच्या मनात घर केले अनेकांच्या संवेदना जागविल्या कवी अनंत राऊत यांनी रसिक श्रोत्यांचे मने जिंकून घेतली अरे दोन तास श्रुती एका जागी खिळवून ठेवले होते.. विविधतेतून नटलेल्या व एकतेचे दर्शन देणाऱ्या आपल्या देशाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा मानवता सर्वश्रेष्ठ आहे ती जोपासली पाहिजे आणि विखे पाटील घराण्याची सामाजिक व राजकीय परंपरा मोठी असल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानादरम्यान सांगितले. यावेळी वीरभद्र देवालयाचे अध्यक्ष जबाजी मेचे,उपाध्यक्ष विजय सदाफळ,नगरसेवक गोटू बोरकर, पूजा गिधाड, अजय आग्रे, रविना माळी, राहुल सदाफळ, पुष्पा आरने, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, संदीप मुर्तडक, मंगल डांगे, अंजली सदाफळ, अनिता शेळके, शीतल बनकर, नितीन गाडेकर, नीता गाडेकर, प्रवीण रूणवाल, अक्षय बोठे, सर्व सुकानु समिती सदस्य, आदी उपस्थित होते.

कवी अनंत राऊत यांचे अनोखे स्वागत… पद्मश्री यांचे मराठीतील लढत आणि इंग्रजी मधील पायोनियर व पद्मभूषण यांचे देह वेचावा कारणी हे आत्मचरित्र दिले भेट

ख्यातनाम कवी तथा गझलकार कवी अनंत राऊत यांचे स्वागत करताना नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी अनोखा पांयडा पाडला सहकाराचं दैवत तथा आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना उभारणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व शेतकऱ्यांची व सर्वसामान्य कष्टकरी गोरगरिबांची मुले डॉक्टर इंजिनिअर व्हावेत उच्चपदस्थ बनावे याकरिता शिक्षणाच्या सर्वांगीण सुविधा निर्माण करून लोणीला शैक्षणिक पंढरी बनविणारे माजी केंद्रीय मंत्री तथा पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्रांचे खंड कवी अनंत राऊत यांना भेट देण्यात आलेत शेतकरी सहकार शिक्षण आरोग्य कृषी जल अभियांत्रिकी अशा विविध पैलूंचे दर्शन व व्यक्तिमत्व घडविणारी आणि जीवन जगायला शिकवणारी ही आत्मचरित्र त्यांच्या दृष्टीने अनोखी भेट होती ती त्यांना खूप भावली

विखे पाटील परिवाराची खूप मोठी सामाजिक व राजकीय परंपरा आहे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित माझा काव्य मैफिल व व्याख्यानाचा कार्यक्रम अतिशय दर्जेदार झाला विशेष म्हणजे सुजय दादावर अतूट प्रेम करणारी माणसं व जीवाला जीव देणारे सर्व नगरसेवक मित्र भेटले आणि राजकारणा पलीकडे जगणारी काही लोक भेटली त्यापैकीएक नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन भाऊ होय माझ्या कवितांवर प्रेम करणारी लोक आवडली राहत्याच्या प्रेमात पडलो मी येथील चाहता वर्ग खूप खतरनाक अर्थात दर्दी आहे याचा मी अनुभव घेतला 

कवी -अनंत राऊत

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!