spot_img
spot_img

पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा): –वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी करून ती स्विकारताना शिर्डी वाहतूक शाखेतील पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले आहे.

आरोपी अशोक रामा शिंदे (वय ४६, पोलीस हवालदार, बक्कल क्रमांक ७९२) हे शिर्डी शहर वाहतूक शाखेशी संबंधित असून सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी येथे संलग्न असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. तक्रारदार हे ३२ वर्षीय असून त्यांचा गौण खनिज वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांना आठ दिवसांपूर्वी वाळू डिलिव्हरीची ऑर्डर मिळाली होती. वाळू वाहतूक सुरू असताना आरोपी पोलीस हवालदाराने त्यांचे हायवा वाहन अडवून कारवाई न करण्यासाठी तसेच वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 50 हजार रुपये हप्त्याची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पडताळणी केली. त्यावेळी आरोपीने तडजोडीअंती दरमहा ४० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान सिन्नर-शिर्डी रोडवरील ढेड फाटा परिसरात पंचांसमक्ष तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार अशोक रामा शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस कर्मचारी विनोद चौधरी, नितीन नेटारे, प्रमोद पाळंदे व चासपोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच कायद्याच्या नावाखाली हप्ते मागितल्याचे प्रकार समोर येत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कुणाकडे? या प्रकरणाची केवळ एका कर्मचाऱ्याच्या अटकेपुरती चौकशी न थांबता संपूर्ण व्यवहाराची पाळेमुळे शोधली जाणार का?

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!