spot_img
spot_img

तारकपूर चौकातील अपघातप्रवण वळणावर अखेर ‘ब्लिंकर’ बसवले; उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांचा तात्काळ पुढाकार

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):-  शहरातील पत्रकार चौक ते डीएसपी चौक दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या तारकपूर चौकातील धोकादायक वळणावर अखेर महानगरपालिकेमार्फत ब्लिंकर (चेतावणी देणारे दिवे) बसवण्यात आले आहेत. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी ही मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेत उपमहापौर ॲड.धनंजय जाधव यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेत हे ब्लिंकर बसवून घेतले.

पत्रकार चौक ते डीएसपी चौक हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र, या मार्गावरील तारकपूर चौकातील वळणाचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने येथे लहान-मोठे अपघात नेहमीचेच झाले होते. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि वेगात येणाऱ्या वाहनांमुळे पादचारी व स्थानिक रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

या गंभीर समस्येची दखल घेत परिसरातील नागरिकांनी उपमहापौर ॲड.धनंजय जाधव यांच्याकडे या वळणावर ब्लिंकर बसवण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन उपमहापौर जाधव यांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला तात्काळ सूचना दिल्या आणि आज प्रत्यक्ष घटनास्थळी ब्लिंकर बसवण्याचे काम पूर्ण करून घेतले. या तात्काळ कार्यवाहीबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत उपमहापौर ॲड.धनंजय जाधव व महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!