spot_img
spot_img

दर्शन रांग भवनाचे दसर्याला औपचारीक उद्घाटन ! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहीती

शिर्डी दि.७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीने भाविकांसाठी विकसित केलेल्या दर्शन रांगेच्या इमारतीचे औपचारीक उद्घाटन विजया दशमीच्या मुहूतार्वर करण्याचे जाहीर करुन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा देणार्या काॅग्रेस नेत्यांची कोंडी केली आहे.

शिर्डी मध्ये येणार्या भाविकांसाठी संस्थानने दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाच्या विकसित केलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटना करीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी निमंत्रण देण्यात आले.मात्र सोयीची तारीख उपलब्ध होत नसल्याने कार्यक्रम लांबणीवर पडत चालला होता.

नेमक्या याच मुद्दयाचे राजकीय भांडवल करून विखे विरोधकांनी थेट आंदोलनाचा इशारा देत या विषयाची राजकीय पोळी भाजून घेण्यास प्रारंभ केला होता.परंतू राजकारणात विरोधकांची बाजी उलटविण्यात माहीर असलेल्या विखे पाटील यांनी शिर्डी मध्ये सुरू असलेले ग्रामस्थ आणी पदाधिकार्यांचे उपोषण सोडताना दर्शन रांगेच्या प्रकल्पाचे उद्घाटन विजया दशमीच्या दिवशी औपचारीकपणे करण्याचा मुहूर्त जाहीर करून टाकला.

याचसंदर्भात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केवळ मुख्यमंत्र्यांना पत्रप्रपंच करून या विषयाला पूर्णपणे राजकीय वळण देण्यास प्रारंभ केल्याने शिर्डीतील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.स्थानिक पातळीवर संस्थान विरूध्द ग्रामस्थ असा संघर्ष अनेकवेळा झाला.परंतू गावातील विषय गावपातळीवर मिटविण्यासाठी सर्वच पक्षांनी यशस्वी प्रयत्न केले.

मात्र कालच्या आ.थोरात यांच्या राजकीय पत्रप्रपंच्याच्या बाबतीत मोठ्या नागरीकांचा नाराजीचा सूर उमटला आहे.वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमास येण्यास प्राथमिक स्तरावर मान्यता देवून कार्यक्रमाला येण्यास सकारत्मकता दर्शवली आहे.परंतू तारीख निश्चित होत नसल्याने हा कार्यक्रम लांबणीवर पडत गेला याच गोष्टीचे राजकारण करण्यास सुरूवात केलेल्या काॅग्रेस नेत्याच्या इशार्याला काही तास उलटत नाही तोच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट उद्घाटनाचा मुहूर्तच जाहीर करून विरोधकांच्या हातातले भांडवलच काढून घेतले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!