नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा तालुक्यातील देवगड व बकूपिंपळगाव परिसरातील तीन विद्यार्थ्यी आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर कठोर परिश्रम घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करत घवघवीत यश संपादन करून परीक्षा उत्तीर्ण झाले.
यात अनुक्रमे १)अमित बाबासाहेब चंद यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झाली.
२) शुभम राजेंद्र चरवंडे यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली ३) तर तेजस सोन्याबापु मते यांची जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता व भूकरमापक, नगर भूमापन कार्यालय अंधेरी येथे अशा दोन पदांवर नियुक्ती झाली .त्यांच्या या यशाने नक्कीच नेवासा तालुक्यातील भावी पिढीला एक आदर्श प्रेरणा मिळेल.
त्यांच्या या यशाने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
या निमित्ताने नेवासा येथे राजेश जगताप यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार करते समयी भाऊसाहेब हारदे, पप्पू परदेशी, निलेश मते, संभाजी पवार आदी उपस्थित होते.




Total Users : 629457