श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीरामपूर नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक मा. श्री. राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर सध्या गाजत असलेल्या ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ‘ फेम कवी श्री. अनंत राऊत यांचा प्रबोधनात्मक काव्यमैफिलीचा कार्यक्रम शनिवार दि.२१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वा आयोजित करण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील मावळा प्रतिष्ठाण व रयतसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक मा. श्री. राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सद्यस्थितीतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक घडामोडींवर आधारीत सुप्रसिद्ध कवी श्री. अनंत राऊत यांचा काव्यमैफिलीचा कार्यक्रम श्रीरामपूर नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेलाआहे. कवी राऊत हे मैत्री या विषयावर बोलताना काव्यमैफिलही रंगवणार आहे. ‘भोंगा वाजलाय, नेता गाजलाय’, ‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ही अनंत राऊत यांची गझल सोशल मीडियावर प्रचंड गाजत असून अप्रतिम आवाज आणि दमदार सादरीकरण यामुळे आपली एक वेगळी ओळख श्री. अनंत राऊत यांनी निर्माण केलेली आहे. काव्यरसिकांसह श्रीरामपूरकरांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती नगरसेवक मा.श्री.राजेंद्र पवार मित्र मंडळाने केली आहे.




Total Users : 630899