spot_img
spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत काकडी येथे संपन्न होणा-या भव्‍य शेतकरी आणि लाभार्थी मेळाव्‍याची जय्यद तयारीचा ना. विखे पाटील यांनी घेतला अधिकाऱ्यासमवेत आढावा एक लाख लोकांना बसता येईल अशा तीन सभामंडपाची उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

शिर्डी, दि.२२ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत काकडी येथे संपन्न होणा-या भव्‍य शेतकरी आणि लाभार्थी मेळाव्‍याची जय्यद तयारी सुरु झाली असून, भव्‍य अशा सभामंडपाच्‍या उभारणीचे कामही सुरु करण्‍यात आले आहे. एक लाख लोकांना बसता येईल अशा तीन मंडपांची उपभारणी याठीकाणी करण्‍यात येत असून, या सर्व तयारीची पाहाणी महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज आधिका-यां समवेत केली.

याच मैदावर काही दिवसांपूर्वी शासन आपल्‍या दारी या भव्‍य अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्‍यात आले होते. त्‍याचधर्तीवर परंतू अधिकची तयारी करुन, पंतप्रधान मोदीजींच्‍या मेळाव्‍यासाठी प्रशासनासह पदाधिकारी, कार्यकर्ते सज्‍ज झाले आहेत. या मैदानाकडे जाणा-या सर्व रस्‍त्‍याचे नुतणीकरणाचे काम वेगाने सुरु झाले असून, जिल्‍ह्यातून येणा-या बस पार्कीक व्‍यवस्‍थेसाठी शेजारच्‍या मोकळ्या जमीनींचा उपयोग करुन, घेत प्रशासनाने पार्कींगची सुविधाही उपलब्‍ध केली आहे.

मुख्‍य कार्यक्रम होणा-या मैदानामध्‍ये तीन भव्‍य मंडप उभारण्‍यात येत असून, २०० हून अधिक कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत. ४०x८० चे भव्‍य व्यासपीठ उभारण्‍याचे काम आता अंतीम टप्‍प्‍यात असून, सभा मंडपांचे कामही अंतीम टप्‍प्‍यात आले आहे. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍यासह जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमट, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्‍यासह शिर्डी नगरपंचायत, साई संस्‍थानच्‍या आधिका-यांनी आज या मैदानावर सर्व तयारीची पाहाणी करुन, आढावा घेतला. संपूर्ण कार्यक्रम उपस्थितांना सहजपणे पाहाता यावा म्‍हणून बसण्‍यासाठी खुर्चांची व्‍यवस्‍था, स्क्रिन बोर्ड तसेच संपूर्णपणे डिजीटल माध्‍यमांचा उपयोग करण्‍यात येणार आहे.

सुरक्षेच्‍या दृष्‍टीनेही सर्व उपाय योजना ही तयारी करतानाच घेण्‍यात येत असून, राष्‍ट्रीय सुरक्षा पथकाचे आधिकारीही आता या तयारीवर लक्ष ठेवून मार्गदर्शक सुचना करीत आहेत. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी तयारीचा आढावा घेतल्‍यानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदीजींचा दौरा हा अतिशय भव्‍यदिव्‍य स्‍वरुपाचा होईल असे नियोजन करण्‍यात येत असून, या नियोजनामध्‍ये त्रृटी राहू नये याची खबरदारी आम्‍ही घेत आहोत. काही दिवसांपूर्वीच शासन आपल्‍या दारी हा सर्वात मोठा उपक्रम आधिका-यांच्‍या सर्व टिमने यशस्‍वी करुन दाखविला आहे. त्‍याचधर्तीवर याही कार्यक्रमाची तयारी असून, येणारे शेतकरी, लाभार्थी आणि नागरीकांशी मोदीजींचा होणारा संवाद याची उत्‍सूकता सर्वांनाच आहे.

जिल्‍ह्यातील वेगवेगळ्या विकास प्रकल्‍पांचे प्रधानमंत्र्याच्‍या हस्‍ते होत असलेले उद्घाटन ही एक सभाधानाची बाब असून, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीतदादा पवार यांच्‍यासह केंद्रीय मंत्री, राज्‍य मंत्रीमंडळातील सदस्‍य आणि महा‍युतीतील घटक पक्षांच्‍या सर्व आमदारांना या भव्‍य अशा कार्यक्रमास निमंत्रीत करण्‍यात आले असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!