राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-१८२ गावांमधील सर्वात जास्त संघर्षमय केलवड गावाला गुरुवारी निळवंडे पाणी मिळाले . गुरुवारी संध्याकाळी केलवडच्या शिवाला पाणी मिळाले आणि गावातील तलावाकडे पाण्याने धाव घेतली निळवंडेच्या पहिल्या चाचणीमध्ये केलवड गाव वंचित राहिले परंतु दुसऱ्या चाचणीत केलवडला पाणी मिळावे यासाठी गावातील शेतकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले पिंपरी लौकि मध्ये मोरीचे काम बाकी राहिल्यामुळे यासाठी खासदार लोखंडे यांची भेट घेऊन पाच लाखांचा निधी खासदार यांनी दिला आणि त्यामधून मोठे काम झाले .
त्यानंतर गावात पाणी प्रवेश करत होते परंतु तलावात पाणी जात नव्हते यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून लाखोंचा निधी जमा केला आणि त्यातून तलावात पाणी काढण्यासाठी चारी तयार केली . तलावात पाणी पोहोचण्यासाठी अथक परिश्रम करणारे शेतकरी रात्रंदिवस जागे राहिले महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी असतानाही कालव्यातून पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी खुल्या केल्या भर पिकात फोकलेन चालू झाले आणि केलवडची आशा 53 वर्षानंतर प्रथमता पूर्ण झाली.
त्यामुळे गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये केलवडचे निळवंडेयोद्धा गंगाधर गमे यांची मोठी मिरवणूक गावातून काढण्यात आली होती यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांनीही या ठिकाणी भेट दिली आणि खासदार लोखंडे यांच्या चांगल्या कामामुळे त्यांनाही मिरवणुकीत सामाविष्ट करण्यात आले. मिरवणुकीत गावात अनेक शेकडो हजारो नागरिक त्या ठिकाणी उपस्थित राहिले मोठा ढोल ताशाच्या गजरात बँजो वाजवून फटाक्यांचा आतिश बाज करण्यात आला .
कालव्यापाशी पाण्याची पूजा गंगाधर गमे व त्यांच्या कुटुंबाच्या हस्ते करण्यात आली . गावातून मिरवणूक काढण्यात आली व मारुती मंदिराला त्या ठिकाणी निळवंडेच्या पाण्याचा अभिषेक घालण्यात आला खासदार लोखंडे आणि पाच लाख दिले गावातील तलावात पाणी जमावे म्हणून शेतकऱ्यांनी वर्गणी दिली आणि आता तलावात पाणी काढण्यासाठी पाईपलाईन व्यवस्था माननीय आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत त्यासाठी गावातील शेतकरी नामदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे गाव सुजलम सुफलम होण्यासाठी विशेष भेट घेणार आहेत .
सदरचे काम लोकवर्गणीतुन व जमीनधारकांचच्या सहकार्यातुन झाले आहे जमीन धारकांना 6 महिन्यात जमीन पूर्ववत करून द्यायची आहे तरी त्या जागी भूमिगत सिमेंट पाईप लाईनची मागणी मा खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या कडे करणार आहोत आणि ती मागणी ते मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे . तसेच गावातील दोन्ही तलाव पूर्ण भरून काढण्यासाठी ना विखे यांची भेट घेतली जाणार आहेत
—–महादू कांदळकर, निळवंडे लाभधारक शेतकरी, केलवड.
गटबाजी सोडून गावाने केली एकजूट
गावात राजकीय बाब बाजूला ठेऊन यामध्ये शेतकऱ्यांनी प्रामाणिक काम केले, कुठल्याही प्रकारचे पद नसताना अभियंत्या प्रमाणे शेतकऱ्यांनी काम केले त्यामुळे पाणी कुठेही अडले नाही
जलजीवन मिशनने तोडले जलजीवन
निळवंडे धरणातून सध्या केलवड गावात पाण्याचा टेल आहे, परंतु संगमनेर पट्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनच्या पाईपणे पाणी उपसले जात आहे, त्यामुळे तेलचे पाणी अगदी पाच इंचाचा मोटारीने चालू आहे ठिकठिकाणी जलजीवन मिशनचे काम चालू आहे अनेक पाईप उघड्यावर पडले आहे . काही भागातील शेतकरी हे पाईप कालव्यात टाकून पाणी उपसा करत आहे . त्यामुळे शनिवारी कालव्यातील पाणी स्थिर झाले आहेत . पूर्ण पाणी चालू होण्यास एक दिवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत .



