नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावर असलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर प्रांगणातील सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.संत नरहरी महाराज मंदिराच्या विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी आमदार शंकरराव गडाख यांच्या समवेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर अध्यक्ष पांडुरंग अभंग,रामभाऊ जगताप, नंदकुमार पाटील, ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात,हभप गहिनीनाथ आढाव,लक्ष्मण जगताप, सतीश पिंपळे,नारायण लोखंडे,निलेश पाटील,कृष्णाजी डहाळे,भाऊसाहेब माळवे,अशोक पोतदार,मंदिर कोषाध्यक्ष श्रीकांत डहाळे,ॲड.जितेंद्र डहाळे, प्रमोद पोतदार,विनायक लोळगे यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराचे मार्गदर्शक कृष्णा डहाळे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.मंदिर सुशोभिकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाज बांधवांच्या वतीने आमदार गडाख यांना धन्यवाद देत आभार मानले.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संत नरहरी महाराज मंदिराच्या उभारणीसाठी सहा गुंठे जागा दान देणारे विनायक पोतदार यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव प्रसाद पोतदार,मूर्ती देणारे सुवर्णकार विजय दहिवाळकर, रेपाळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार शंकरराव गडाख म्हणाले की संत नरहरी महाराज मंदिराच्या सुशोभिकरणामुळे तीर्थक्षेत्र वैभवात भर पडणार आहे,सुशोभिकरणाच्या कामाच्या अंतर्गत येथे भर घालून पेव्हर ब्लॉक टाकून कंपाउंड करण्यात येणार असल्याने दर्जेदार काम होणार आहे,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावरच हे मंदिर असल्याने या मंदिराच्या विकासासाठी मी माझ्या प्रयत्नाने योगदान देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही देत त्यांनी वारकरी संप्रदायातील श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर उद्यानातील राहिलेली कामे पूर्णत्वाकडे नेले जाईल यासाठी मी स्व:त लक्ष घालेन असे बोलतांना स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी सुवर्णकार समाजातील कचरू डहाळे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी ॲड.जितेंद्र डहाळे,प्रशांत माळवे,जयदीप जामदार,किरण घोडेकर,अतुल सोनार,रमेश डहाळे, कृष्णा डहाळे, संजय अंबिलवादे,शंकर अंबिलवादे,रोहन पोतदार,विकास पोतदार, वरद पोतदार यांच्यासह मंदिर विश्वस्त, सुवर्णकार समाज बांधव नेवासा शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.




Total Users : 631707