spot_img
spot_img

लोणीच्या प्रवरा कन्या विद्यामंदीर जलतरण संघ  करणार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे विभागाचे नेतृत्व

लोणी दि.२८( जनता आवाज वृत्तसेवा ):-बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे झालेल्या पुणे विभागीय जलतरण स्पर्धेत विद्यालयातील रिले संघातील स्पर्धक विद्यार्थ्यींनी – कु सेजल लष्करे, कु सुप्रिया अपसुंदे, कु खतेले साक्षी कु शौर्य जगताप यांची राज्यस्तरीय जलतरण रिले संघात प्रथम क्रमांकाने निवड झाली. तसेच कु सेजल लष्करे या मुलीची १९ वर्ष वयोगटाखालील १०० मीटर स्पर्धेत सिल्वर पदक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. एकूण पाच मुलींची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली.

यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्विमिंग कोच सुचित्रा तांबे , क्रीडा शिक्षिका सौ विद्या घोरपडे मॅडम , तसेच हॉकी कोच कल्पना कडू मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,,जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील , लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत पा घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ , शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे , समन्वयक प्रा. नंदकुमार दळे ,क्रिडा संचालक डाॅ.प्रदिप विखे, प्रवरा कन्या मंदिरच्या प्राचार्या सौ भारती कुमकर ,सौ सीमा बढे , पर्यवेक्षक बी. पी. चिंधे, अनिल लोखंडे ,मोहिनी गायके , आर. एम. लबडे, सुरेश गोडगे व सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यीनी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!