राहाता (जनता आवाज वृत्तसेवा): – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण ढवळून निघाले मागील काही दिवसा पूर्वी आंदोलक श्री मनोज जरांगे पाटील यांनी सतरा दिवसाचे उपोषण केले होते त्यानंतर राज्य सरकारने त्यांचे कडून तीस दिवसाचा वेळ मागून घेतलेला होता त्यानंतर श्री जरांगे पाटील त्यांनी सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली होती परंतु या मुदतीमधे सरकारने आपले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे श्री जरांगे पाटील पुन्हा मागील पाच दिवसा पासून आमरण उपोषणसाठी बसले आहेत त्यांच्या या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राहाता तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शिर्डी येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे.
काल सायंकाळी सकल मराठा समाज्याच्या वतीने शिर्डी येथे कॅण्डल मार्च काढण्यात आला होता आज संपूर्ण तालुक्यात सकल मराठा समाज्याच्या वतीने बंद ची हाक देण्यात आली होती या बंदला उस्फूर्त प्रतिसाद देत राहता व साकुरी शहरातील सर्व व्यापारी बंधु यांनी आपले सर्व व्यवहार हे बंद ठेवले आहे व आपला पाठिंबा मराठा समाजाच्या आरक्षणस दर्शविला आहे .




Total Users : 631416