श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- क्रीडा क्षेत्रामध्ये आज बऱ्याच संधी खेळाडूंना उपलब्ध झाल्या आहेत, आत्ताच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी शंभरच्यावर मेडल प्राप्त केले आहे. आज केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्हीच्या माध्यमातून खेळाडूंना मिळणा-या रक्कमेमध्ये मोठी वाढ केली आहे. आमच्या बोरावके महाविद्यालयामध्ये सुद्धा खेळाडूंना विविध प्रकारच्या संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत आमच्या महाविद्यालयाने आंतर विभागीय व्हॉलीबॉल मुले व मुली स्पर्धेचे आयोजन केले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 25 ते 27 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये अंतर विभागीय व्हॉलीबॉल मुले व मुली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रविण बडधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुनील चोळके, डॉ. जगदाळे, पुणे विद्यापीठाचे सहाय्यक क्रीडा संचालक डॉ.दत्ता महादम, महाविदयालयाचे सर्व विभाग प्रमुख, चारही जिल्ह्यांमधून आलेले सर्व संघ व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि मैदानाचे पूजन करून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय म्हस्के यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा आलेख खेळाडूंसमोर मांडला. या स्पर्धेमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ तयार होणार आहे ] महाविद्यालयाला या स्पर्धेचे आयोजन दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार व्यक्त करतो.
यावेळी डॉ.दत्ता महादम यांनी पुणे विद्यापीठाचे संघ कशा पद्धतीने आंतर विद्यापीठ, क्रीडा महोत्सवामध्ये कामगिरी करतात याची माहिती खेळाडूंना करून दिली. तसेच स्पर्धाकालावधीमध्ये खेळाडूंनी शिस्त पाळून संघ भावनेने आपला खेळ करावा असे सांगितले.यावेळी डॉ.सुनील चौळके, डॉ.जगदाळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक आणि अहमदनगर असे चार मुलांचे व चार मुलींचे संघ या स्पर्धेसाठी आलेले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय म्हस्के, प्रा.संभाजी ढेरे, प्रा.अविनाश बिबवे, श्री दत्तात्रय सोनवणे परीश्रम घेत आहेत.




Total Users : 631009