नगर दि.१६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्याची मागणी लक्षात घेवून निळवंडे धरणातून सुरू असलेल्या आवर्तनाचा कालावधी वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून लाभक्षेत्राचील विविध गावातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून आवर्तन वाढवावे आशी मागणी करीत होते.अनेक लोकप्रतनिधी सुध्दा याबबात आग्रहीपणे करीत असलेली मागणी विचारात घेवून मंत्री विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सुरू असलेल्या आवर्तनामध्ये अधिकची वाढ करून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या.
आज कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत निळवंडे धरणातील पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणीचे गांभीर्य विचारात घेतानाच डाव्या कालव्याची चाचणी तातडीने करायची आहे.उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडण्याच्या दिलेल्या शब्दाची पूर्तता करायची असल्याने अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने नियोजन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
मंत्री विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे निळवंडे आवर्तनाचा कालवधी आता वाढणार असून शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल असा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.



