नेवासा फाटा(जनता आवाज वृत्तसेवा):- शैक्षणिक क्षेत्रात सतत होत असलेले बदल बघता शिक्षकांनी बदलाप्रमाणे स्वतःला बदलावे. ‘ब्रोकन विंडोज थेअरी’चा अवलंब करावा. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. आपले विचार सकारात्मक ठेवावे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करा,असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी अरुणजी धामणे यांनी आपले पहिले पुष्पगुंठांना व्यक्त केले.
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित सर्व शाखांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे पाटील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्बोधन वर्गाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.शिक्षण महर्षी साहेबराव घाडगेपाटील यांच्या तैलचित्रास अभिवादन करण्यात आले
माजी शिक्षणाधिकारी अरुणजी धामणे साहेब यांचा सत्कार संस्थेच्या सहसचिव डॉ.श्रुती आमलेपाटील व संस्थेचे विश्वस्त चेतन चव्हाणपाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे यांनी केले. माजी शिक्षणाधिकारी अरुणजी धामणे यांनी ‘व्यक्तिमत्व विकास व शिक्षकाची भूमिका’ या विषयावर आपले प्रगल्भ विचार शिक्षकांसमोर मांडले. या कार्यशाळेसाठी सर्व शाखेतील सर्व माध्यमांचे सुमारे १३५६ शिक्षक उपस्थित होते.
उद्बोधन वर्गासाठी संस्थेच्या सहसचिव डॉ. श्रुती आमले,संस्थेचे विश्वस्त चेतन चव्हाण, प्रशासक सचिन कर्डिले, बाळासाहेब कोकरे मनीषा राऊत,संतोष जावळे,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे,अरविंद देशमुख, श्रीदेवी नायर,आशिष भारती समन्वयक दत्तात्रय वांढेकर,पर्यवेक्षक संजयसिंह चौहान,सर्व विभागाचे विभाग प्रमुख,सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य अरविंद देशमुख यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण दळे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली



