spot_img
spot_img

कोल्हारमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २३ जणांविरुद्ध गुन्हा बसस्थानकासमोर सुरू होता कथित हारजीतीचा जुगार; ३.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार बसस्थानकासमोर कथित हारजीतचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणी पोलिसांनी रविवारी (दि. २६) सायंकाळी छापा टाकून २३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन व पत्त्यांचा संच असा ३ लाख ११ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोणी पोलिसांत गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सोमेश कैलास गरदास यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये दिनकर दशरथ काळे, लहू लक्ष्मण पवार, नितीन श्रावण खुडे, राहुल राजेंद्र बोरुडे यांच्यासह एकूण २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

छाप्यात आरोपींसमोर ठेवलेली रोख रक्कम, आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले मोबाईल फोन व रोख रक्कम, तसेच पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ११ हजार १५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आडागळे करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!